Health Care: आहारात ‘या’ पदार्थांचा अभाव वाढवू शकतो मधुमेहाचा धोका, या चुका टाळा

आपल्या आहारात एका पदार्थाचा अभाव असेल तर मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

Health Care: आहारात 'या' पदार्थांचा अभाव वाढवू शकतो मधुमेहाचा धोका, या चुका टाळा
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 12:32 PM

नवी दिल्ली – आजकाल लोक वजन कमी (weight loss) करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी महागडे डाएट प्लान्स (diet) आणि व्यायामाचे रूटिन फॉलो करतात. डाएट करताना ॲक्टिव्ह राहणे, व्यायाम करणे ही चांगली सवय आहे. मात्र बऱ्याच वेळा लोक या नादात आपल्या आरोग्याचे (health) नुकसान करतात. सोशल मीडियाच्या या युगात, आहाराशी संबंधित अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न करणे हे सामान्य असले तरी ते चुकीचेही ठरू शकते. एका अभ्यासानुसार, आहारातील काही चुकांमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

टुलाने युनिव्हिर्सिटीद्वारे करण्यात आलेल्या संशोधनातून हा माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आपल्या आहारात एका पदार्थाचा अभाव असेल तर मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

आहारात या गोष्टीची कमतरता भासू देऊ नका

येथे आपण आहारात कार्ब्सचा समावेश न करण्याबद्दल बोलत आहोत, जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लो-कार्ब आहार हा शरीरात इन्सुलिन सिस्टिम खराब करतो आणि अशा परिस्थितीत मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनासाठी काही लोकांचे गट तयार केले गेले, ज्यामध्ये एक गट कमी कार्ब असलेल्या आहाराचे सेवन करत होता. या रिपोर्ट्सनुसार, कमी कार्ब्सचे सेवन करणाऱ्या ग्रुपमधील लोकांमध्ये सहा महिन्यानंतर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी कमी कार्ब्स असलेल्या आहाराचे सेवन करणे चांगले आहे. परंतु त्याच्या सततच्या कमतरतेमुळे केवळ मधुमेहाचा धोका उद्भवत नाही तर आरोग्याच्या इतर समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

या पदार्थांद्वारे आहारात कार्ब्सचा करा समावेश

– ब्रेड आणि तांदूळ केवळ हेच पदार्थ कार्ब्सचा एकमेव स्त्रोत नाही. त्याऐवजी तुम्ही हेल्दी कार्ब्ससह कमी-कॅलरीज असलेली फळे आणि भाज्या खाऊ शकता. या गोष्टी खाल्ल्याने वजन वाढत नाही. तसेच, त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

– ग्रीन टीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात जे भूक लागणरे हार्मोन्स नियंत्रित करतात. तसेच हे कार्ब्स साखरेची पातळी देखील नियंत्रित करतात व मेटाबॉलिजमही वाढवतात.

– संपूर्ण धान्य आणि मसूर हे हेल्दी कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्रोत ठरतात. त्यामध्ये प्रोटीन्स, लोह, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक द्रव्येही मुबलक प्रमाणात असतात. तसेच धान्य व मसूर यांमध्ये फॅट्स कमी असतात व फायबर भरपूर प्रमाणात असते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.