Corona: ओमिक्रॉनच्या धसक्यानं चित्र पालटलं, लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली, अजून 1 कोटी 41 लाख लोकांचा पहिला डोस बाकी

महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government ) आणि केंद्र सरकार कोरोना विषाणू ससंर्ग (Corona) रोखण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवत आहेत. लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

Corona: ओमिक्रॉनच्या धसक्यानं चित्र पालटलं, लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली, अजून 1 कोटी 41 लाख लोकांचा पहिला डोस बाकी
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 11:09 AM

मुंबई: महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government ) आणि केंद्र सरकार कोरोना विषाणू ससंर्ग (Corona) रोखण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवत आहेत. लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. राज्य सरकारनं 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलं होतं. मात्र, राज्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाने होत असले तरी सुमारे 1 कोटी 41 लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्राही घेतलेली नाही. ही चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. मात्र, ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटच्या संसर्गामुळं कोरोना लसीकरणाकडे नागरिकांनी पुन्हा एकदा मोर्चा वळवला आहे.

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण बाकी

महाराष्ट्रात अद्याप 1 कोटी 41 लाख नागरिकांनी कोरोना लस घेतलेली नाही. यामध्ये सर्वाधिक 13 लाख 83 हजार नागरिक ठाणे जिल्ह्यातील आहेत. या खालोखाल नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नोव्हेंबरमध्ये कमी झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी कमी होत गेली. परंतु डिसेंबरमध्ये ओमायक्रॉनच्या भीतीने पुन्हा लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली.

सर्वाधिक दैनंदिन लसीकरण डिसेंबरमध्ये

जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक दैनंदिन सरासरी लसीकरण डिसेंबरमध्ये झाले आहे. या काळात रोज सरासरी 8 लाख 79 हजार नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढला असला तरी अजूनही राज्यात 15 टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा देणे बाकी आहे.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 48 वर

महाराष्ट्रात ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 48 वर पोहोचली आहे. राज्यात काल सापडलेल्या एकूण 8 रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मुंबई विमानतळ कार्यक्षेत्रातील आहेत. तीन रुग्ण सातारा तर एक रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. इतर तीन रुग्ण हे छत्तीसगड, केरळ आणि जळगावचा रहिवासी आहेत. साताऱ्यातील 3 जणांनी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला होता. या तीन जणांपैकी एक रुग्ण 8 वर्षाची मुलगी आहे.

इतर बातम्या:

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Video : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, कर्नाटक सरकारला इशारा

Maharashtra Corona Vaccination Update one crore forty lakh people not take first jab of Corona vaccine after omicron variant vaccination take speed

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...