Omicron symptoms | ओमिक्रॉनचे संकेत आहेत ही लक्षणं, सर्दी-ताप असल्यास जराही निष्काळजीपणा नकोच! वाचा सविस्तर

Omicron symptoms : तज्ज्ञांच्या मते कोविड-१९ चा ओमिक्रॉन वेरिएंट, डेल्टा आणि मागील काही अन्य वेरिएंटप्रमाणे रिऍक्ट करत नाही. अनेक रिसर्चनंतर हे समोर आले आहे कि, कोविड-१९ च्या अन्य वेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन खुपच माइल्ड आहे.

Omicron symptoms | ओमिक्रॉनचे संकेत आहेत ही लक्षणं, सर्दी-ताप असल्यास जराही निष्काळजीपणा नकोच! वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 3:13 PM

Omicron symptoms : ओमिक्रॉनचा (Omicron) जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झाल्यानंतर भारतात सुध्दा ओमिक्रॉन मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतो. भारतात ओमिक्रॉनने संक्रमीत होणा-यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय. या धोक्याचा अंदाज घेवून वैज्ञानिक या वेरिएंटच्या विरोधात एंटीबॉडी विकसित करण्यासाठी दिवसरात्र रिसर्च करताना आहेत. घशात खवखव, सर्दी- खोकला नसताना घशात खवखव ओमिक्रॉनची सर्वसाधारण लक्षणं असू शकतात.

हिवाळ्यात बदलत्या वातावरणानुसार इम्युनिटी कमी ( Weakness of immunity) होणे, सर्वसाधारण समस्या आहे. ज्यामुळे बदलत्या वातावरणानुसार सर्दी- ताप (Cold and cough) येणे ब-याचदा अनेकांसोबत होत असते. मात्र अलिकडेच नाकातून पाणी येणे (Runny nose) हे ओमिक्रॉनचे लक्षण असू शकते, असं अभ्यासातून समोर आलंय.

तज्ज्ञांचा दावा काय?

तज्ज्ञांच्या मते, काही लक्षणं अशी आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ज्यामध्ये वाहणारे नाक हे ओमिक्रॉनचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांनुसार हे जाणुन घेणे लोकांसाठी आश्चर्यकारक असू शकते, कारण यूके सरकारने कोविड १९ च्या जून्या तीन लक्षणांशिवाय कोविड लक्षणांची गाईडलाईन अपडेट केलेली नाही.

सध्यातरी असे वाटत आहे कि, नाकातून पाणी येणे (Runny nose) , शिंका येणे (sneezing) आणि घशात खवखव (Sore throat) ही लक्षणे आसणा-या केस सर्वाधिक नोंदवल्या जात आहेत. तसेच पाठीच्या खालील बाजूस दुखणे (Low back pain), मांसपेशींमध्ये दुखणे (Muscle aches) आणि रात्रीचा घाम येणे (Night sweats) ही ओमिक्रॉनची प्रमुख लक्षणं आहेत.

तज्ज्ञांनी हे सुध्दा सांगितले आहे कि, सर्दी किंवा तापाची लक्षणं समजून यांच्याकडे दुर्लक्ष केले जावू शकते, किंवा जर हेवी वर्कआउट केले असेल तर त्यामुळे सुध्दा मसल्स पेन होवू शकते. नाकातून पाणी येणे, शरिराच्या काही भागात दुखणे म्हणजे याचा अर्थ असा नाही कि तुम्ही ओमिक्रॉनने संक्रमीत आहात. मात्र जर तुम्हाला थोडे देखील अशक्त वाटत असेल, तसेच तुमच्या लक्षणांबद्दल आश्वस्त नसाल तर चांगले हेच असेल कि तुमच्या आणि इतरांच्या काळजीपोटी टेस्ट करुन घेणे. तसेच स्वतला आयसोलेटेड करणे गरजेचे आहे.

घाम येणे सुध्दा ओमिक्रॉनचे लक्षण

ब्रिटिश जनरल फिजिशियन डॉ. आमिर खान यांच्यानुसार, ओमिक्रोन ने संक्रमीत झाल्यावर अधिकचा घाम येवू शकतो, यावेळी घामामुळे तुमचे कपडे भिजल्यामुळे तुम्हाला ते बदलावे सुध्दा लागू शकतात. काही लोकांसाठी अधिकचा घाम येणे हे नित्याचे सुध्दा असू शकते. यामध्ये अशा महिलांचा समावेश असू शकतो ज्यांना मासिक पाळी येणे बंद झालेले आहे. ज्यांना एंग्जायटी आहे, जे लोक औषधं घेतात, जे लोक ड्रग्ज आणि दारूचे सेवन करतात, याशिवाय ज्यांना हायपरहायड्रोसीस (Hyperhidrosis) इत्यादी आहे. मात्र यानंतर सुद्धा तुम्हाला कोविड १९ च्या इतर वेरीएंटची लक्षणें जाणून घेण्यासाठी टेस्ट करणे आवश्यक असेल, ज्याने याचा प्रसार आपण थांबवू शकतो. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण पद्धत हिच आहे की, आपण लसीचा बूस्टर डोस घेणे सुध्दा अत्यंत आवश्यक आहे.

मागील वेरीएंट पेक्षा आहे हलका?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोविड १९ चा ओमिक्रोन वेरीएंट , डेल्टा आणि इतर वेरीएंट प्रमाणे रिॲक्ट करत नाही. अनेक रिसर्च मधून हि गोष्ट समोर आली आहे की कोविड १९ च्या इतर वेरीएंटच्या तुलनेत ओमिक्रोन (Omicron) अगदी माईल्ड म्हणजेच हलक्या स्वरूपाचा आहे.

तर तिकडे ब्रिटनमधील पहिल्या ऑफिशियल रिपोर्ट नुसार ओमिक्रोन वेरीएंटने संक्रमित लोकांना डेल्टाच्या तुलनेत हॉस्पिटल मध्ये भर्ती बकरण्याचे प्रमाण ५० ते ७० टक्के कमी आहे. हेल्थ एक्सपर्ट आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोविड बुस्टर ओमिक्रोन पासून बचाव करतात.

इतर बातम्या –

Mask | कोरोना विषाणू किती मिनिटांत गाठणार? मास्क ठरवणार! या 16 पैकी तुमचा मास्क कोणता?

Postpartum Care | बाळंतपणानंतरही पुन्हा सडपातळ व्हा, वजन नियंत्रणासाठी घरगुती उपाय

Hair Care Tips: हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.