ओमिक्रॉन विरुद्धचं युद्ध सुरू! नाईट कर्फ्यूपासून ते उत्सवांवर बंदी; केंद्राच्या राज्यांना आणखी काय काय सूचना
आतापर्यंत 16 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे 269 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या नव्या विषाणूची गंभीर दखल घेतली आहे.
नवी दिल्ली: आतापर्यंत 16 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे 269 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या नव्या विषाणूची गंभीर दखल घेतली आहे. ओमिक्रॉन रोखण्यासाठी राज्यांनी काय तयारी केली त्याचा आढावा आज केंद्र सरकारने घेतला. तसेच ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूपासून ते सणांवर बंदी घालण्यापर्यंतच्या सूचनाही दिल्या आहेत.
राज्यांमधील जिल्ह्यांतील पॉझिटिव्ह केसेस, डबल रेटिंग आणि क्लस्टरवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही केंद्र सरकारने यावेळी दिल्या. त्याशिवाय राज्यांना सण आणि स्थानिक स्तरावर प्रतिबंध घालण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दोन डोसमुळे कोरोनापासून बचाव होतो. तसेच ओमिक्रॉनची लागण आणि रुग्णालयात भरती होण्यापासून दोन डोसच बचाव करू शकतात. त्यामुळे घरोघरी जाऊन लसीकरण करा, असा सल्लाही केंद्राने राज्यांना दिला आहे.
ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी 5 सूचना
>> नाईट कर्फ्यू लावा, गर्दी रोखा. येणारे सण पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवा. कोरोनाच्या केसेस वाढल्यास कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन तयार करा.
>> टेस्टिंग आणि सर्व्हेलान्सवर विशेष लक्ष द्या. टेस्ट करा, घरोघरी जाऊन रुग्ण शोधा आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवा.
>> रुग्णालयात बेड, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय उपकरणे वाढवण्यावर भर द्या. ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवला पाहिजे. 30 दिवसांच्या औषधांचा स्टॉक तयार ठेवा.
>> सातत्याने माहिती द्या, त्यामुळे अफवा पसरणार नाहीत. राज्यांनी रोज पत्रकार परिषद घ्याव्यात.
>> राज्यात 100 टक्के लसीकरणावर फोकस द्या. ज्येष्ठांना दोन्ही डोस द्या. घरोघरी जाऊन लसीकरण करा.
मुंबईत रुग्ण किती?
दरम्यान, मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आलेख घसरताच आहे. या महिन्यात जवळपास पाच दिवस मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नाही. राज्यात 14 डिसेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान सक्रिय रुग्णसंख्या 9 टक्क्यांनी वाढली. हा आकडा 7,093 पर्यंत केला. यापूर्वीच्या आठवड्यात ही संख्या 6,481 एवढी होती. राज्य आजार सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, रुग्णांमधील ही वाढ अगदी कमी प्रमाणात असून ती शहरापुरती मर्यादित आहे.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 23 December 2021#Fastnews #news https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/UDVQe7JSOL
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2021
संबंधित बातम्या:
‘शक्ती कायदा’ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर, महिला अत्याचाराला आळा बसणार? काय आहे शक्ती कायदा?