20 रुपयाच्या तुमच्या आवडत्या पेयामुळे केस गळण्याचा धोका, पडू शकतं टक्कल
आपल्या लाइफस्टाइलमधील एक महत्वाचा पदार्थ आपल्या केसगळतीसाठी आणि टक्कल पडण्यास कारणीभूत ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?
नवी दिल्ली – सध्या लोकांची जीवनशैली खूप झपाट्याने (change in lifestyle) बदलली आहे यात काहीच शंका नाही. आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयींवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणे, मोबाईल फोनच्या स्क्रीनवर सतत वेळ घालवणे, कॉम्प्युटरवर काम करणे, पौष्टिक घटक नसणाऱ्या आणि जंक फूडचे (junk food) अतिसेवन या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा भाग बनल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या जीवनशैलीत असलेला एक महत्वाचा पदार्थ केस गळण्यासाठी (hair fall) आणि टक्कल पडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?
लाइफस्टालमुळे केसगळती
चीनच्या शिंहुआ युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी एका संशोधनात धक्कदायक खुलासा केला आहे. ‘जर्नल न्यूट्रिएंट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, खाद्यपदार्थांमध्ये बेकिंग सोड्याचा जास्त वापर आणि सोड्याचे नियमित सेवन केल्याने पुरुषांमध्ये अकाली टक्कल पडण्याची शक्यता वाढते. मात्र, आपल्या जीवनशैलीत काही बदल करून ही समस्या टाळता येऊ शकते.
महिला की पुरुष कोणाला अधिक धोका ?
या धक्कादायक संशोधनामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. या संशोधनात, पुरुषांचे केस गळण्याची शक्यता 57% अधिक असल्याचे म्हटले जाते. खरंतर, संशोधकांनी 18 ते 45 वयोगटातील 1028 निरोगी पुरुषांवर हा अभ्यास केला आणि असे आढळले की जे पुरुष दिवसातून किमान एकदा सोडा पितात त्यांना केस गळण्याचा धोका 57 टक्के जास्त असतो. म्हणजेच, जर तुम्ही भरपूर सोडा पीत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण केस लवकर गळणे म्हणजे लवकर टक्कल पडणे. त्यामुळे सोड्याचे सेवन शक्य तितके कमी करावे.
सोडा पिणं धोकादायक का आहे ?
शिंहुआ युनिव्हर्सिटीद्वारे करण्यात आलेल्या संशोधनात असेही समोर आले आहे की, सोडा पिणे हे सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. यातील अहवालानुसार, जर एखाद्या पुरुषाने आठवड्यातून केवळ एकदा सोडा प्यायला तरी त्याला केस गळण्याचा धोका 21 टक्के जास्त असतो. आठवड्यातून दोन ते चार वेळा सोडा प्यायल्यास हाच धोका 26 टक्क्यांपर्यंत वाढतो. याचा अर्थ असा की सोड्याचे नियमित सेवन हे तुमच्यासाठी अतिशय धोकादायक असून त्यामुळे डोक्यावरील केस जाऊ शकतात.
कोणत्या वयात धोका अधिक ?
संशोधकांच्या सांगण्यानुसार, खराब आहारामुळे शरीरात पोषक तत्वांच्या कमतरता निर्माण होते व त्यामुळे सुमारे दोन तृतीयांश लोकांना केवळ 35 व्या वर्षी टक्कल पडू शकते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की बहुतेक पुरुषांना 50 व्या वर्षी टक्कल पडते, तर खराब जीवनशैलीमुळे पुरुषांना 21 व्या वर्षापूर्वी 25 टक्क्यांपर्यंत टक्कल पडते किंवा त्यांना केस गळण्याचा त्रास होतो. ही समस्या वाढत्या वयासोबत वाढत जाते आणि वाढत्या वयानुसार टक्कल पडू लागते.
केस वाचवायचे असतील हे पदार्थ खाणे सोडा
संशोधकांच्या सांगण्यानुसार, सोड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असलेली साखर ही हानिकारक असून ती केस गळण्यासाठी कारणीभूत ठरते. संशोधनानुसार, केस गळण्यामागे इतर घटकांचा समावेश होतो :
1) तळलेले पदार्थ सेवन करणे
2) साखरयुक्त पदार्थ
3) आईस्क्रीम
4) मिठाई किंवा गोड पदार्थ
हे सर्व पदार्थ आवडणाऱ्या लोकांनी यापासून शक्य तितके दूर रहावे, कारण त्यामुळे टक्कल वाढण्याची शक्यता असते.