कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना नव्या आजाराची लागण; मुंबईच्या रुग्णालयातील चिंताजनक प्रकार
म्यूकोर्मिकोसिस म्हणजे एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून हा अतिशय जीवघेणा आजार आहे. | Coronavirus
मुंबई: परळ येथील ग्लोबल रूग्णालयात कोरोनामुक्तीनंतर (Coronavirus) ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा बुरशीजन्य आजार झालेल्या महिलेचे प्राण वाचवण्यात आले.या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे असा त्रास जाणवतो. (Patients recovering from coronavirus infected with mucormycosis fungal infection in Mumbai)
म्यूकोर्मिकोसिस म्हणजे एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून हा अतिशय जीवघेणा आजार आहे. या रूग्णांची संख्या सध्या वाढताना दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार व्हावेत असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. यासाठी परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘म्युकॉरर्मायकोसिस’ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ‘फंगल इन्फेक्शन’ वर उपचार करणारे मुंबईतील हे पहिले क्लिनिक ठरले आहे.
रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणे जाणवतात?
धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या शैला सोनार यांना कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने आणि रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ आजार झाला होता. या महिलेच्या नाकात आणि डोक्यापर्यंत हा संसर्ग पोहोचला होता. स्थानिक रूग्णालयात या महिलेवर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्रास वाढू लागल्याने कुटुंबियांनी तिला डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात दाखल केले.
याठिकाणी महिलेवर अँटी-फंगल थेरपी सुरू करण्यात करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे संसर्ग झालेल्या डोक्यावरील टाळूचा अर्धा भाग काढून टाकण्यात आला. वेळीच उपचार झाल्याने या महिलेचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. यावर सर्जन डॉ. मिलिंद नवलखे सांगितले की, म्यूकोर्मिकोसिस आजाराचा मधुमेह रूग्ण आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रूग्णांना याचा धोका अधिक असतो. कोरोनमुक्त ५० हून अधिक रूग्ण मागील तीन महिन्यात रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी आले होते.
यात रूग्णाला सर्दी व नाकाला सूज येते. यावर वेळीच उपचार न झाल्यास डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. परंतु, अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रूग्ण उशीरा डॉक्टरांकडे जातात. अशावेळी वैद्यकीय तपासणी केली असता रूग्णाला म्यूकोर्मिकोसिस असल्याचं निदान होते. अशा स्थितीत संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील ज्या भागात संसर्ग झाला आहे तो भाग काढून टाकावा लागत असल्याचे डॉक्टर सांगतात.
संबंधित बातम्या:
कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये समोर आलं धक्कादायक लक्षण, नाशिकमध्ये खळबळ
(Patients recovering from coronavirus infected with mucormycosis fungal infection in Mumbai)