Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus : या दोन ब्लड ग्रुपच्या लोकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज

सीएसआयआरच्या या अहवालात असे दिसून आले आहे की, शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांसाहारी लोकांमध्ये कोविड -19 चा धोका जास्त असतो. (People of these two blood groups need to be more careful in corona situation)

Corona Virus : या दोन ब्लड ग्रुपच्या लोकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज
या दोन ब्लड ग्रुपच्या लोकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 7:14 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या लाटेमुळे संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) एक संशोधन पत्र प्रकाशित केले आहे ज्यामध्ये असे सूचित केले गेले आहे की, कोविड -19 पेक्षा AB आणि B रक्तगटातील लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. असा दावा केला गेला आहे की, उर्वरित रक्त गटांच्या तुलनेत AB आणि B रक्तगटातील लोकांना कोरोनामुळे जास्त त्रास होत आहे. रिसर्च पेपरमध्ये असेही म्हटले आहे की O रक्तगटाच्या लोकांवर या आजाराचा सर्वात कमी परिणाम होतो. या रक्तगटातील बहुतेक रूग्ण एकतर एसीम्प्टोमॅटिक किंवा अत्यंत सौम्य लक्षणे दर्शवितात. हा अहवाल सीएसआयआरने देशभरात संकलित केलेल्या सिरोपोसेटीव्ह सर्व्हेवर आधारीत आहे. (People of these two blood groups need to be more careful in corona situation)

मांसाहारी लोकांमध्ये कोरोनाचा धोका अधिक

सीएसआयआरच्या या अहवालात असे दिसून आले आहे की, शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांसाहारी लोकांमध्ये कोविड -19 चा धोका जास्त असतो. हा दावा देशभरातील सुमारे 10,000 लोकांच्या नमुन्यांवर आधारीत आहे, ज्याचे विश्लेषण 140 डॉक्टरांच्या टीमने केले आहे. असे आढळले की मांसाहार करणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या शाकाहारी लोकांपेक्षा जास्त असते आणि शाकाहारी आहारामध्ये हाय फायबर याचे कारण आहे.

बी रक्तगटात कोरोना संसर्गाची शक्यता थोडी कमी

फायबर-समृद्ध आहार हा अँटी-इन्फ्लेमेटरी आहे, जो केवळ संसर्गानंतर गंभीर स्थितीस प्रतिबंधच करीत नाही, तर शरीरात होणारे संक्रमण देखील रोखू शकतो. सर्व्हेक्षणात असेही सांगितले गेले आहे की कोरोना संसर्गाच्या बहुतेक केसेस AB रक्तगटामध्ये झाल्या आहेत. तर B रक्तगटात कोरोना संसर्गाची शक्यता थोडीशी कमी आहे. तर O रक्तगटाच्या लोकांमध्ये सर्वात कमी सिरोपॉझिटिव्हिटी पाहिली गेली आहे.

काय म्हणाले डॉ. अशोक शर्मा?

आग्रा येथील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. अशोक शर्मा यांनी मीडियाला सांगितले की, हे सर्व एखाद्या व्यक्तीच्या अनुवांशिक संरचनेवर अवलंबून असते. उदाहरण देऊन ते म्हणाले, ‘थॅलेसीमिया (रक्ताशी संबंधित अनुवांशिक रोग) असलेले लोक मलेरियामुळे फारच कमी प्रमाणात प्रभावित होतात. अनेक केसेसमध्ये हे ही दिसून आले की घरातील एका सदस्याखेरीज इतर सर्व जण कोरोना झाला आहे. हे अनुवांशिक संरचनेमुळे होते.

डॉ. शर्मा म्हणाले, ‘ओ रक्तगटाच्या माणसांची रोगप्रतिकारक शक्ती एबी आणि बी रक्तगटातील लोकांच्या तुलनेत अधिक चांगला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. तथापि, यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की ओ रक्तगटाच्या लोकांनी कोविड प्रतिबंधासाठी सर्व प्रोटोकॉलचे पालन करणे बंद करावे. त्यांनी सांगितले की ओ रक्तगटाचे लोकदेखील विषाणूपासून पूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यातही जटिल लक्षणे विकसित होत आहेत.

काय म्हणाले डॉ. कालरा?

सीएसआयआरच्या या सर्व्हेवर ज्येष्ठ चिकित्सक डॉ. एस. के. कालरा म्हणाले की, हा सर्वेक्षणचा केवळ एक नमुना आहे, असे कोणतेही वैज्ञानिक संशोधन पेपर सापडलेले नाही. वैज्ञानिक समज न घेता वेगवेगळ्या रक्त गटांमधील लोकांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कसे निश्चित केले जाऊ शकते. ओ रक्तगटाच्या लोकांमध्ये संक्रमणास प्रतिकार करण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली असते, हे सांगणे फार घाईटे ठरेल. ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर केलेल्या सर्वेक्षणात वेगळे चित्र समोर येऊ शकते.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने दिल्ली ते महाराष्ट्रापर्यंत लोक हादरले आहेत. स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पवित्र गंगा नदीत मृतदेह वाहताना दिसतात. संक्रमित लोकांचे मृतदेह अंत्यसंस्कार करण्याऐवजी नद्यांमध्ये टाकले जात आहेत. बिहारमध्ये अशा केसेस सातत्याने पाहायला मिळत आहेत. दरम्यान, कोविड रूग्णांच्या रिकवरीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. गेल्या चोवीस तासांत देशातील 3.55 लाखाहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. इतकेच नाही तर अॅक्टिव्ह केसमध्येही कपात झाली आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय प्रकरणांची संख्या 25 हजारांनी कमी केली आहे, ही एक दिलासा देणारी बाब आहे. सोमवारी भारतात कोरोना विषाणूच्या एकूण 3,29,379 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाच्या अलिकडील केसेसच्या तुलनेत ही आकडेवारी काही अंशी नियंत्रणात आहे. दिल्लीत आदल्या दिवशी जवळपास 12 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. (People of these two blood groups need to be more careful in corona situation)

इतर बातम्या

12 हजार पगार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्ज मिळवणे सोपे, मुथुट फायनान्सची जबरदस्त सेवा

World Test Championship | हिटमॅन रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये किर्तीमान करण्याची संधी

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.