डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांसाठी फक्त 59 रुपयांत इन्श्योरन्स! जाणून घ्या डिटेल
डेंग्यू, मलेरियासारखे आजार कधी होतील सांगता येत नाही. डास चावल्याने हे आजार होतात. कधी कुठे काय होईल सांगता येत नाही. अनेकदा महागड्या इन्श्योरन्स प्लानमुळे कव्हर घेणं कठीण होतं. पण आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण फक्त 59 रुपयात इन्श्योरन्स कव्हर मिळणार आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePeने हा प्लान लाँच केला आहे.
डेंग्यू, मलेरियासारखा आजार झाला तर हॉस्पिटलचं बिल पाहून पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहात नाही. त्यात महागडे इन्श्योरन्स प्लान घेणं प्रत्येकालाच परवडत असं नाही. त्यामुळे अनेक जण हेल्थ इन्श्योरन्स काढत नाहीत. कारण त्याचा हप्ताच परवडत नाही. मग डेंग्यू, मलेरियासारखा आजार झाला की हॉस्पिटलची पायरी चढतानाच थरथर होते. पण आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण फक्त 59 रुपयात डेंग्यु, मलेरियासारखे आजा कव्हर होणार आहेत. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe ने एक खास प्लान लाँच केला आहे. या प्लान अंतर्गत फक्त 59 रुपयात वर्षभराचं कव्हर मिळणार आहे. यात 1 लाखापर्यंत हॉस्पिटलचा खर्च मिळणार आहे. या प्लान अंतर्गत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लूसही 10 पेक्षा अधिक आजारांवर उपचार घेता येणार आहेत. या योजनेत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, फायलेरियासिस, जपानी एन्सेफलायटीस, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, टायफॉइड, क्षयरोग आणि मेंदुज्वर यासह 10 हून अधिक आजारांचा समावेश आहे. यात रुग्णालयात दाखल करण्यापासून डायग्नोस्टिक्स आणि आयसीयूचा खर्चही मिळणार आहे. इतकंच काय तर हा प्लान मोसमी नसून वर्षभरासाठी आहे.
PhonePeने ही योजना देशातील टियर-2 आणि टियर-3 शहरात राहणाऱ्या लोकांसाठी डिझाईन केला आहे. जेथे परवडणाऱ्या आरोग्य विम्याचे प्लान मर्यादित आहेत. कॉर्पोरेट आरोग्य विम्याचे अतिरिक्त कव्हर म्हणून देखील ही योजना कार्यरत व्यावसायिकांसाठी फायदेशीर आहे. फोनपे इन्श्योरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेजचे सीईओ विशाल गुप्ता यांनी सांगितलं की, या प्लानच्या माध्यमातून विमा परवडणारा आणि सुलभ बनवला आहे. सेवा नसलेल्या भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे.
फोनपेच्या माध्यमातून हा हेल्थ प्लान आरामात घेऊ शकता. युजर्सला एपमध्ये इन्शोरन्स सेक्शनमधये जाऊन Dengue And Malaria Insurance पर्याय निवडावा लागेल. यात प्लानबाबतच्या सर्व डिटेल्स दिसतील. हा परवडणारा प्लान असून सोयीस्कर आहे. इतकंच काय तर या प्लानच्या माध्यमातून क्लेमही झटपट सेटल होणार आहे. त्यामुळे हा प्लान येताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भविष्यात असे अनेक प्लान येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.