IVF च्या माध्यमातून आई बाबा होण्याचा प्लॅन करताय? महामारीच्या काळात या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा!
IVF ट्रिटमेंटसाठी रुग्णालयात अनेकदा फेराव्या माराव्या लागतात. | IVF treatment pregnancy Coronavirus
मुंबई: कोरोना संकटामुळे सध्या इतर गोष्टींसाठी वैद्यकीय उपचार घेत असलेल्या लोकांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. इनफर्टिलिटी ट्रिटमेंट किंवा आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे (IVF treatment) बाळासाठी प्रयत्न करत असणाऱ्या जोडप्यांना सध्या या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. IVF ट्रिटमेंटसाठी रुग्णालयात अनेकदा फेराव्या माराव्या लागतात. त्यामुळे आपल्याला कोरोना होई शकतो, या भीतीने अनेक जोडप्यांनी सध्या बाळ जन्माला (pregnancy) घालण्याचा प्लॅनच पुढे ढकलला आहे. (Planning pregnancy in a pandemic Key tips for couples undergoing IVF treatment)
कोरोनामुळे गर्भातील बाळावर किंवा प्रसुतीदरम्यान कोणतीही समस्या निर्माण होत असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी कोरोना लस सुरक्षित असल्याचेही एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाकाळातही बाळ जन्माला घालण्याचा प्लॅन पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
आयव्हीएफ ट्रिटमेंट सुरु असलेल्या जोडप्यांसाठी काही खास टिप्स खालीलप्रमाणे:
* आयव्हीएफ ट्रिटमेंट घेणाऱ्या जोडप्यांनी सकारात्मक आणि प्रकृती उत्तम ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी शांत आणि मानसिकरित्या स्थिर असणेही तितकेच गरजेचे आहे. * सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे गरजेचे. * बाहेर गेल्यास हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे आणि चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. * फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. * विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.
* आयव्हीएफ ट्रिटमेंट नीटपणे सुरु ठेवणे. * डॉक्टरांनी दिलेला प्रत्येक सल्ला तंतोतंत पाळा. * रुग्णालयात गेल्यावर कमीतकमी लोकांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करा. * षोषक आणि समतोल आहाराचे सेवन करा. * रेडी टू इट किंवा जंक फूड खाणे टाळा. * योगा आणि मेडिटेशन करा. स्वत:ला शांत, रिलॅक्सड आणि आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा. * उच्च रक्तदाब, डायबेटिस, फुफ्फुसांचे विकार, किडनीचे आजार असलेल्यांनी आयव्हीएफ ट्रिटमेंटपूर्वी डॉक्टरांशी चर्चा करावी. * आयव्हीएफ ट्रिटमेंट घेण्यासाठी शक्यतो स्पेशलाईज सेंटरची निवड करावी. जेणेकरून तुम्ही इतर रुग्णांच्या संपर्कात येणार नाही. * आयव्हीएफ ट्रिटमेंट सुरु करण्यापूर्वी एकदा स्वत:ची कोरोना टेस्ट करुन घ्यावी.
(Planning pregnancy in a pandemic Key tips for couples undergoing IVF treatment)