AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pre Menopause | चिंता सोडा, निवांत व्हा! ‘प्री-मेनोपॉज’नंतरही घेता येईल मातृत्वाचा आनंद…

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिला प्री-मेनोपॉजला सामोऱ्या जात आहेत. सध्या बऱ्याच महिलांना वयाच्या 40व्या वर्षी रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉजच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Pre Menopause | चिंता सोडा, निवांत व्हा! ‘प्री-मेनोपॉज’नंतरही घेता येईल मातृत्वाचा आनंद...
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिला प्री-मेनोपॉजला सामोऱ्या जात आहेत.
| Updated on: Dec 18, 2020 | 5:02 PM
Share

मुंबई : रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज ही महिलांच्या आयुष्यातील एक सामान्य प्रक्रिया आहे. जी साधारणतः 45 ते 55 वर्षे वयोगटातील प्रत्येक स्त्रीला सहन करावी लागते. पण आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिला प्री-मेनोपॉजला सामोऱ्या जात आहेत. सध्या बऱ्याच महिलांना वयाच्या 40व्या वर्षी रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉजच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे (Pre Menopause reasons and process for becoming a mother after Menopause).

याचा सर्वाधिक फटका काही कारणास्तव वयाच्या 30 वर्षानंतर लग्न करणाऱ्या स्त्रियांना सहन करावा लागतो. रजोनिवृत्तीच्या पूर्वस्थितीमुळे बर्‍याच स्त्रिया मातृत्वाच्या आनंदांपासून वंचित राहतात. जर तुम्ही प्री-मेनोपॉजच्या प्रक्रियेतून जात असाल आणि तुम्हाला आई बनवायची असेल तर काळजी करू नका. आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रजोनिवृत्तीनंतरही तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.

मेनोपॉज म्हणजे काय?

जेव्हा, स्त्रीच्या अंडाशयातील अंडी संपतात, तेव्हा मासिक पाळी थांबते, या स्थितीस मेनोपॉज म्हणतात. सोप्या शब्दांत, रजोनिवृत्ती म्हणजे एखाद्या महिलेची मासिक पाळी कायमस्वरूपी थांबते. यानंतर, कोणतीही स्त्री नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नाही. सामान्यत: रजोनिवृत्ती 45 ते 55 वर्षांच्या दरम्यान असते. या वयोमर्यादेपूर्वी होण्याऱ्या रजोनिवृत्तीच्या स्थितीस ‘प्री मेनोपॉज’ म्हणतात. तर, यानंतरच्या स्थितीस ‘पोस्ट मेनोपॉज’ म्हणतात. दोन्ही वेळी महिलांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो.

लक्षणे ओळखा

साधारण पाच वर्षांआधीच मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत महिलांना मासिक पाळीतील अनियमितता, जास्त उष्णता, त्वचेचा काळेपणा, वजायनल कोरडेपणा, मूड स्विंग, चिडचिडेपणा यासारखे लक्षणे दिसू लागतात (Pre Menopause reasons and process for becoming a mother after Menopause).

मेनोपॉजनंतर वाढत्या समस्या

मेनोपॉजनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही हार्मोन्सची उत्पत्ती थांबते. हे हार्मोन्स हाडे मजबूत करतात आणि हृदयासाठी चांगले असतात. हार्मोन्सचे तयार न झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. याशिवाय बर्‍याच वेळा हाय बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील दिसू लागतात. दुसरीकडे, जर हा प्री मेनोपॉज असेल तर, अशा समस्या स्रियांना वेळे आधीच सहन कराव्या लागतात. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मेनोपॉजनंतरही घेऊ शकता मातृत्वाचा आनंद

तंत्रज्ञानाच्या या जगात रजोनिवृत्तीनंतरही आई होणे शक्य झाले आहे. परंतु, यासाठी दुसर्‍या महिलेच्या अंड्यांची आवश्यकता आहे. यात आयव्हीएफद्वारे, दुसर्‍या महिलेचे अंडे फलित करून, मातृत्वाचा आनंद घेऊ इच्छित असणाऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते.

(Pre Menopause reasons and process for becoming a mother after Menopause)

हेही वाचा : 

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.