पुण्यात खासगी रुग्णालयातही कोरोना लस, किती रुपये दर आकारणार?

पुणे महापालिकेकडून 42 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Pune Corona Vaccine Private Hospitals)

पुण्यात खासगी रुग्णालयातही कोरोना लस, किती रुपये दर आकारणार?
coronavirus
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 8:17 AM

पुणे : पुण्यात खासगी रुग्णालयातही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे. (Pune Corona Vaccine in Private Hospitals what will be the cost)

केंद्र शासनाने नुकतीच 60 वर्षांपुढील सर्व व्यक्तींना, तर 45 वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या (को-मोर्बिलिटी) नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी मिळाली आहे. यापैकी 150 रुपये शासनाकडे भरावे लागतील, तर शंभर रुपये रुग्णालय प्रशासनाला मिळतील.

42 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा

दरम्यान, पुणे महापालिकेकडून 42 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 100 या प्रमाणे दिवसाला पाच हजार लस मोफत देण्याचे नियोजन करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

राज्यात काय स्थिती?

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण 5 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोना लस देण्यात आली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 739 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर कालच्या दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात 412 कोरोनाग्रस्त रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 260 गंभीर रुग्ण असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मुंबईत नगरसेवकांना लसीकरण

राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे, असेही राजेश टोपे म्हणाले होते. तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा

(Pune Corona Vaccine in Private Hospitals what will be the cost)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.