महाराष्ट्र कोरोना लसीकरणासाठी सज्ज, ड्रग्ज कंट्रोलच्या परवानगीची प्रतीक्षा: राजेश टोपे
सीरम आणि भारत बायोटेक मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवतील, असं राजेश टोपे म्हणाले. (Rajesh Tope Corona vaccination)
जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भारत बायोटेकच्या लसीला केंद्र सरकारच्या डीसीजीएनं मंजुरी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.लसीकरणासाठी आता फक्त ड्रग्ज कंट्रोल अथॉरिटिच्या परवानगीची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालना येथे बोलत होते. सीरम इनस्टिट्यूटच्या लसीनंतर आता केंद्र सरकारनं भारत बायोटेकच्या लसीलाही परवानगी दिल्यानंतर लसीकरणात याची मदत होईल, असं राजेश टोपे म्हणाले. आता या दोन्ही कंपन्या मोठ्या पद्धतीनं लसीकरणाचा कार्यक्रम राबवू शकतील, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला. (Rajesh Tope said Maharashtra is ready for corona vaccination)
ड्रग्ज कंटोल अथॉरिटीनं लवकर परवानगी द्यावी
महाराष्ट्र राज्य लसीकरणासाठी सज्ज आहे. आता फक्त ड्रग्ज कंट्रोल विभागानं लसीकरणाला परवानगी द्यावी, त्यानंतर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येईल, असं राजेश टोपे म्हणाले. डीसीजीएनं सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीला परवागनी दिल्यामुळं राजेश टोपेंनी दोन्ही कंपन्यांच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे.
डीसीजीएकडून कोवॅक्सिन आणि झायडसच्या लसीला मंजुरी
भारताच्या औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला आणि झायडस कॅडिला या लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज डीसीजीआयची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला या तिन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या आठवडाभरातच फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस टोचली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
झायडस कॅडिलाच्या ट्रायलला मंजुरी
सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही व्हॅक्सिन 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतं, असं डीसीजीआयने सांगितलं. तसेच झायडस कॅडीच्या तिसऱ्या ट्रायललाही मंजुरी देण्यात आल्याचंही डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे. या दोन्ही व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकणार आहे. तसेच रुग्णाला दोन्ही इंजेक्शनचे दोन-दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम होणार असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.
Rajesh Tope | कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहितीhttps://t.co/V3wMZre2yx@rajeshtope11 #RajeshTope #CoronaVaccination
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2021
संबंधित बातम्या:
कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी
लढ्याला यश! भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता
(Rajesh Tope said Maharashtra is ready for corona vaccination)