मुंबई : व्यसन (Addiction) कोणतेही असो, ते आरोग्यासाठी धोकादायकच असते. बरेच लोक टेन्शन आले की, लगेचच हातामध्ये सिगारेट घेतात आणि ओढत बसतात. मग अशावेळी एकपेक्षाही अधिक सिगारेट ओढल्या जातात. जवळपास सर्वांनाच माहिती आहे की, धुम्रपान करणे आरोग्यासाठी (Health) अत्यंत घातक आहे. तसेच धुम्रपानसंदर्भातील अनेक जाहिराती या पेपर आणि टिव्हीवरती सतत सुरू असतात. मात्र, शरीरासाठी धुम्रपान करणे धोकादायक (Dangerous) आहे. यामुळे गंभीर प्रकारचे अनेक आजार होऊ शकतात, हे माहिती असून सुध्दा अनेक लोक दिवसातून 3-4 वेळा सिगारेट ओढतातच.
नुकताच अमेरिकेमधील एका अभ्यासातून एक धक्कादायक आणि सिगारेट ओढणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा समोर आली आहे. अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे हे वाचल्यानंतर तुमच्या हातामध्ये असलेली सिगारेट नक्कीच खाली पडेल. यावर कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. सिगारेट आणि यामुळे होणारे डोळ्यांवरील परिणाम याचा संशोधनातून शोध घेण्यात आला आहे. भारतामध्ये तर प्रौढ व्यक्तींना सिगारेटचे व्यसन मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे दरवर्षी 10 लाख लोकांचा जवळपास मृत्यू होतो.
सिगारेटचे व्यसन असलेल्या लोकांचे डोळे लवकर खराब होतात, असे संशोधनामधून दिसून आले आहे. जर एखाद्याला आपले डोळे सुरक्षित ठेवायचे असतील तर त्यांनी सिगारेटपासून चार हात लांब राहणे खूप जास्त गरजेचे आहे. विशेष म्हणजे सिगारेट ओढणे फक्त जो ओढत आहे त्याच्याच आरोग्यासाठी धोकादायक नसून सिगारेटच्या धुरामुळे इतरांच्या आरोग्यावर देखील खतरनाक परिणाम होतात आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. याचमुळे जर आपल्या आसपास कोणी जर सिगारेट ओढत असेल तर तिथुन तुम्ही दूर जा.
आपण डाॅक्टरांना अनेकदा बोलताना बघितले असेल की, लहान मुलं घरामध्ये असल्यावर अजिबात घरामध्ये सिगारेट ओढली नाही पाहिजे. तसेच सार्वजनिक ठिकाणे विशेष: दवाखान्यामध्ये अनेक बोर्ड लिहिलेले असतात की, इथे धुम्रपान करण्यास मनाई आहे…याचे कारणे म्हणजे सिगारेटच्या धुरामुळे देखील अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. ज्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे. त्यांना प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि डोळ्यांचे विविध आजार होण्याची शक्यता असते.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips : दह्यापासून बनवलेले हे फेसपॅक वापरा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!
Summer Diet : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या डाळींचा आहारात समावेश करा!