धावण्यापूर्वी हलकाफुलका आहार घ्यावा की घेऊ नये?; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

वर्कआऊट करणं आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं. तज्ज्ञांच्या मते 30 मिनिटं वर्कआऊट करणं आवश्यक आहे. मात्र, फारच कमी लोक डेली रुटीनमध्ये वर्कआऊट फॉलो करतात. (Running Workout: should you eat or not eat before a running workout?)

धावण्यापूर्वी हलकाफुलका आहार घ्यावा की घेऊ नये?; वाचा तज्ज्ञ काय सांगतात
running workout
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 7:46 AM

मुंबई: वर्कआऊट करणं आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं. तज्ज्ञांच्या मते 30 मिनिटं वर्कआऊट करणं आवश्यक आहे. मात्र, फारच कमी लोक डेली रुटीनमध्ये वर्कआऊट फॉलो करतात. त्यामुळे वजन वाढतं आणि मग आजाराच्या विळख्यात ते सापडतात. त्यामुळे प्रत्येकाने 24 तासातून किमान एक घंटा तरी वर्कआऊट केलंच पाहिजे. त्यासाठी एक तासाचा वेळ काढलाच पाहिजे. (Running Workout: should you eat or not eat before a running workout?)

तसं पाहता नियमितपणे वर्कआऊट करणाऱ्यांच्या मनातही अनेक प्रश्न असतात. धावण्यापूर्वी (रनिंग) काही खायला हवं का? आणि खायचं असेल तर काय खाल्लं पाहिजे? आदी प्रश्न या लोकांच्या मनात येतात. त्यावर तज्त्राचं काय मत आहे, यावर टाकलेला हा प्रकाश.

धावण्यापूर्वी खाणं कितपत योग्य?

काही दिवसांपूर्वी डॉक्टर सलिल पाटील यांनी त्यांच्या सोशल पेजवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी रोज धावण्यासाठी जाणाऱ्यांच्या मनातील प्रश्नांना वाट मोकळी करून दिली होती. धावण्यास जाण्यापूर्वी काही खायला हवं की नाही? असं अनेकदा लोकं विचारत असतात, असं पाटील म्हणताना दिसतात.

जर तुम्ही 30 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक रनिंग करणार असाल तर लाइट ब्रेकफास्ट करू शकता. त्यामुळे एनर्जी वाढते. मात्र, 5 ते 10 किलोमीटर एवढं शॉर्ट डिस्टन्स धावणार असाल तर रिकाम्या पोटी धावू शकता, असं डॉ. पाटील सांगतात. या बाबतची माहिती ‘नवभारत टाईम्स’ने दिली आहे.

काय खावं?

रिकाम्या पोटी दूरवर धावताना अडचणी येत असतील तर तुम्ही काही खाऊ शकता. याचा अर्थ भरपेट खावं असं नाही. 30 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक दूरवर धावणार असाल तर धावण्यापूर्वी एक सफरचंद, केळं, ब्रेड टोस्ट खाऊ शकता. धावताना अधूनमधून थोडं थोडं पाणी प्या. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या

>> बरेच लोक धावण्यासाठी जातात आणि जोरजोरात धावू लागतात. ही पद्धत योग्य नाही. >> धावण्यापूर्वी काही एक्सरसाईज करून स्वत:ला वॉर्म अप करून घ्या >> धावताना रनिंग शूज घाला. चप्पल घालू नका. बुटांशिवाय धावल्यास गुडघे आणि टाचांवर जोर येतो आणि त्यामुळे दुखू लागते. >> शोल्डर लेव्हल किंवा नॉर्मल अंतरावर पायांच्या हालचाली करा. अधिक लांब स्टेप घेऊ नका, ती योग्य पद्धत नाही. >> धावताना जमिनीवर टाचा घासू नका. त्यामुळे गुडघे दुखू शकतात. >> रनिंग केल्यानंतर नेहमी स्ट्रेचिंग करा (Running Workout: should you eat or not eat before a running workout?)

संबंधित बातम्या:

लहान मुलांचे केस पांढरे का होतात?, काय केलं पाहिजे?; वाचा कामाची बातमी! 

Makeup Tips : नॅचरल मेकअपने सौंदर्य वाढवायचेय?; मग तर या टिप्स फाॅलो करा!

Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हे’ फूड कॉम्बिनेशन फायदेशीर, वाचा याबद्दल सविस्तर!

(Running Workout: should you eat or not eat before a running workout?)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.