Side effects of triphala : डॉक्टरांना न विचारता त्रिफळा खाऊ नका; नाहीतर होईल ‘हे’ नुकसान!

त्रिफळा साइड इफेक्ट्स आयुर्वेद ही जगातील सर्वात जुनी उपचार पद्धती आहे. आयुर्वेदामध्ये विविध प्रकारचे रोग आणि आरोग्यविषयक स्थिती बरे करण्याची क्षमता आहे. परंतु, काही आयुर्वेदिक औषधी शरीरासाठी घातकही ठरू शकतात. त्यामुळे डॉक्टरांना विचारल्याशिवाय अशा औषधीचे सेवन न करणेच योग्य ठरते.

Side effects of triphala : डॉक्टरांना न विचारता त्रिफळा खाऊ नका; नाहीतर होईल ‘हे’ नुकसान!
डॉक्टरांना न विचारता त्रिफळा खाऊ नका
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 6:05 PM

भारतात अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचीही मदत घेतली जाते. आयुर्वेद ही जगातील सर्वात जुनी उपचार पद्धती (Ancient healing methods) आहे. आयुर्वेदामध्ये विविध प्रकारचे रोग आणि आरोग्यविषयक स्थिती बरे करण्याची क्षमता आहे. त्याच्या उपचारासाठी विविध नैसर्गिक औषधी वनस्पती, फळे आणि इतर घटक वापरले जातात. परंतु, काही आयुर्वेदिक औषधी शरीरासाठी घातकही ठरू शकतात. त्यामुळे, डॉक्टरांना विचारल्याशिवाय अशा औषधीचे सेवन न करणेच योग्य ठरते. आयुर्वेदात अशी अनेक औषधे आहेत, जी तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरतात. यांपैकी एक म्हणजे त्रिफळा. त्रिफळा ही अशीच एक हर्बल पावडर (A herbal powder) आहे, जी तीन वेगवेगळ्या प्रकारची फळे वापरून बनवली जाते. त्रिफळा पावडर (Triphala powder) अमलकी, बिभिटकी आणि हरितकीपासून बनवली जाते. या पावडरचे अनेक आरोग्य फायदे आहेत. तुम्हाला याची अनेक सप्लिमेंट्स आणि टॅब्लेटही बाजारात मिळतील. पण ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन केल्याने हानी होते, त्याचप्रमाणे त्रिफळा जास्त प्रमाणात सेवन करू नये.

रक्तातील साखर कमी होऊ शकते

तज्ज्ञाच्या मते, त्रिफळामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. जे रुग्ण आधीच मधुमेहाची औषधे घेत आहेत, त्यांच्यामध्ये त्रिफळा खाल्ल्याने हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. ज्यामुळे रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर त्रिफळा चूर्ण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

  1.  त्रिफळा पचनावर परिणाम करू शकतो. त्याच्या अतिसेवनामुळे अतिसार, पोटदुखी, गॅस आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. याचे कारण असे की त्रिफळा एक सौम्य रेचक आहे, ज्यामुळे पचन बिघडू शकते. त्यामुळे, अशी लक्षणे जाणवली, तर त्रिफळा घेणे थांबवा.
  2. गर्भधारणेदरम्यान अनेक प्रकारच्या समस्या सुरू होऊ शकतात. त्रिफळामध्ये हरतकी नावाचा घटक असतो, जो गर्भधारणेदरम्यान वापरण्यासाठी सुरक्षित नाही. याचा आईवर तसेच बाळावरही घातक परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भधारणेदरम्यान त्याचे सेवन टाळणे चांगले.
  3. हे सुद्धा वाचा
  4. त्रिफळा खाल्ल्याने तुमचा रक्तदाब कमी होतो. त्रिफळा पावडरमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. परंतु त्याचा जास्त प्रमाणात वापर करण्याची शिफारस केलेली नाही. रक्तदाब कमी होणे हे चांगले लक्षण मानले जात नाही.
  5. हे तुमच्या औषधांशी संयोग साधू शकते. पावडर शरीरातील एंजाइमच्या कामावर परिणाम करू शकते. त्यामुळे औषधे नीट काम करू शकत नाहीत. त्यामुळे त्रिफळा चुर्णाचे जास्त सेवन टाळणे चांगले.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.