Sidharth Shukla Passes away | सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, जाणून घ्या तरुण का ठरतायत हृदयविकाराचे बळी…

सहसा हृदयाशी संबंधित आजार एका वयानंतर लोकांमध्ये दिसतात, परंतु गेल्या एका वर्षात हृदयविकाराच्या झटक्यामुळे तरुणांचा मृत्यू झपाट्याने वाढला आहे. तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांना कारणीभूत असणारी मुख्य कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया...

Sidharth Shukla Passes away | सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, जाणून घ्या तरुण का ठरतायत हृदयविकाराचे बळी...
सिद्धार्थ शुक्ला
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 1:07 PM

मुंबई : अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता आणि त्याला यापूर्वी हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता. अशा स्थितीत सिद्धार्थच्या अचानक मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सहसा हृदयाशी संबंधित आजार एका वयानंतर लोकांमध्ये दिसतात, परंतु गेल्या एका वर्षात हृदयविकाराच्या झटक्यामुळे तरुणांचा मृत्यू झपाट्याने वाढला आहे. तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांना कारणीभूत असणारी मुख्य कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया…

व्यसन

आजकाल बहुतेक तरुण 18 ते 25 वर्षांच्या वयात धूम्रपान आणि अल्कोहोल पिण्यास सुरुवात करतात. डॉक्टरांच्या मते, तरुणांची ही सवय त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा बळी बनवत आहे. वास्तविक, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी हृदयरोग ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे अनेक प्रकारचे हृदयरोग होतात.

जंक फूड

आजची बहुतेक तरुण पिढी आपली भूक भागवण्यासाठी घरच्या अन्नाऐवजी जंक फूडवर अवलंबून आहे. त्यांच्या ताटात मुख्यतः तळलेल्या आणि अरबट-चरबट गोष्टींसह चायनीज खाद्यपदार्थांचा समावेश असतो. ज्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयावर वाईट परिणाम होतो.

कामाचा दबाव

व्यस्त जीवनशैली आणि धावपळीमुळे तरुण आजकाल आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करत आहेत. भूक लागल्यावर ते बाहेर उपलब्ध असलेल्या जंक फूडवर अवलंबून राहू लागतात. जास्त तास काम करणे आणि जंक फूडचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवर थेट परिणाम होतो. हेच कारण आहे की तरुण लोक कमी वयात रक्तदाबाचे बळी ठरत आहेत.

स्टेरॉईड्सचे दुष्परिणाम

तरुणाईवर बॉलिवूड सेलिब्रिटींची क्रेझ इतकी आहे की, त्यांच्यासारखे शरीर तयार करण्यासाठी ते तासन् तास जिममध्ये घाम गाळतात. असा घाम गाळणे ठीक आहे, परंतु अनेक ठिकाणी तरुणांना व्यायामशाळेत हेवी डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. पौष्टिकतेच्या शोधात, तरुण लोक एम्बॉलिक स्टिरॉइड्स सारख्या उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत राहतो.

हृदय्विकारच्या झटक्याची लक्षणे

हृदयविकाराचा झटका येण्याची अशी निश्चित वेळ नाही. एखादी व्यक्ती कधीही या रोगाच्या कचाट्यात येऊ शकते. असे असूनही, हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी, अशी अनेक लक्षणे आहेत जी त्या व्यक्तीला सतर्क करतात की, आपण हृदयविकाराचा बळी होऊ शकता. अत्यंत थकवा, निद्रानाश, श्वास घेण्यात अडचण, छातीत अस्वस्थता, आंबट ढेकर, हृदयाचा अनियमित ठोका आणि पाय-घोट्यांना सूज येणे ही हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आहेत.

हेही वाचा :

Siddharth Shukla Passes away : अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली आणि सकाळी तो उठूच शकला नाही!

Sidharth Shukla dies : अभिनयात रस नव्हता, मॉडेलिंगही करायचे नव्हते, मग सिद्धार्थ शुक्ला मनोरंजन विश्वात आला कसा?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.