AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा आणि सिगारेट सोबत घेण्याची तुम्हालाही सवय ? मग हे वाचलंच पाहिजे…

चहा आणि सिगारेट एकत्रित सेवन आरोग्याला हानिकारक आहे. यामुळे हृदयरोग, कर्करोग, पचनसंस्थेतील समस्या आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. निकोटिन आणि चहातील घटकांचा संयुक्त प्रभाव शरीरावर घातक आहे.

चहा आणि सिगारेट सोबत घेण्याची तुम्हालाही सवय ? मग हे वाचलंच पाहिजे...
चहा आणि सिगारेट
| Edited By: | Updated on: Jan 25, 2025 | 5:00 PM
Share

अनेकांना तुम्ही चहा पिताना त्यासोबत सिगारेट ओढताना पाहिलं असेल. एक फॅशन म्हणून अनेकजण सिगारेट ओढत असतात. तुम्हीही चहासोबत सिगारेटचे धूर ओढत असाल तर आताच सावध व्हा. कारण असं केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. आम्ही तुम्हाला याबाबतच्या संभाव्य आजारांची माहिती देणार आहोत. चहा पित असताना सिगारेट पिणं अनेकांना चांगलं वाटतं. काही प्रमाणात ते ठिक आहे. पण ही रोजची आणि वारंवारची प्रॅक्टिस असेल तर मात्र तुम्हाला ते घातक ठरू शकतं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून वेळीच सावध व्हा.

साधारणपणे, धूम्रपानाची सवय असलेल्या काही लोकांना चहा पिण्यासोबत सिगारेट देखील हवं असतो. चहा आणि सिगारेट एकत्र घेणं शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी चहा आणि सिगारेट प्यायल्याने केल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सुरुवातीला याचे परिणाम जाणवले तरी, हळूहळू ते शरीरावर वाईट परिणाम करू शकतात. भविष्यात हृदयरोग, कर्करोग यांसारख्या दुर्मिळ आजारांचे धोके वाढतात.

चहा आणि सिगारेट एकत्र घेतल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता किमान 30 टक्के वाढते. चहा पिणे पाचन प्रणालीला हानी पोहोचवू शकते. तसेच, सिगारेट शरीराच्या पेशींना हानी पोहोचवते, असं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. या समस्यांसह, चहा आणि सिगारेटचा संगम शरीरासाठी आणखी काही गंभीर समस्या निर्माण करू शकतो.

सिगारेट आणि चहा एकत्र घेण्याचे धोके…

हृदयरोगाचे धोके

मेंदूला स्ट्रोक

हात-पायाच्या हर्नियाचा त्रास

स्मृती कमी होण्याची समस्या

श्वासोच्छवासाचे विकार

पचन समस्यांसाठी

प्रजननक्षमतेवर प्रभाव

एक सिगारेटमध्ये साधारणत 6-12 मिलिग्रॅम निकोटिन असतो. सिगारेट पिणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत 2-3 पट जास्त असतो. सिगारेटमधील निकोटिन हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनींमध्ये संकुचन निर्माण करतो, ज्यामुळे हृदयाला ताजे आणि स्वच्छ रक्त पुरवठा होऊ शकत नाही आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

चहामध्ये असलेले पॉलिफेनॉल्स (प्राकृतिक तत्त्वे) साधारणपणे हृदयासाठी चांगले मानले जातात. पण चहामध्ये दूध घातल्यावर याच्या चांगल्या गुणधर्मांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. दूधातील कॅसिन प्रोटीन चहातील पॉलिफेनॉल्सच्या कार्यावर नकारात्मक प्रभाव टाकते. यामुळे जास्त चहा पिण्याने हृदयाची धडधड आणि रक्तदाब वाढू शकतो.

चहा आणि सिगारेटची सवय सोडण्याचे उपाय :

तुमची इच्छाशक्ति आणि ठराविक संकल्पशक्ति वाढवून तुम्ही या सवयीतून आरामात मुक्त होऊ शकता.

चहा जास्त प्यायल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. त्याचा प्रतिकूल परिणाम किडनीवर होऊ शकतो. जर तुम्हाला ही सवय एकट्याने सोडता येत नसेल तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची किंवा जवळच्या मित्रांची मदत घ्या.

अनेक लोक तणावाच्या स्थितीत जास्त चहा किंवा सिगारेट पिण्यास सुरुवात करतात. अशा वेळी, चहा आणि सिगारेट घेण्यापूर्वी, तुम्ही तणाव का आहे हे समजून त्यावर उपाय शोधा. हे महत्त्वाचे कारण म्हणजे, ज्यांना चहा आणि सिगारेटची सवय लागलेली आहे, त्यांना थोडासा तणाव किंवा अस्वस्थता जाणवल्यास ते लगेच चहा किंवा सिगारेट घेतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.