Child care : लहान मुलांच्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे उपाय करा, तोंड नेहमी राहील निरोगी!
लहान मुलांच्या तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. लहान मुले दिवसभर काही ना काही पदार्थ खात असतात अशावेळी अनेकदा दात किडल्यामुळे त्याच्या तोंडातून घाणेरडा वास येऊ लागतो.
मुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या घरी लहान मुले असतात. लहान मुले दिवसभर काही ना काही पदार्थ खात असतात. दिवसभर चॉकलेट, पिझ्झा, बर्गर व अन्य वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याने अनेकदा तोंडाचे आरोग्य बिघडते. बहुतेक वेळा लहान मुलांच्या तोंडातून दुर्गंधी म्हणजेच घाणेरडा वास येऊ लागतो. हा घाणेरडा वास दूर करण्यासाठी पालक वेगवेगळे उपाय करतात परंतु अनेक उपाय केल्यानंतर सुद्धा लहान मुलांच्या तोंडातील दुर्गंधी दूर होत नाही. ही दुर्गंधी येण्यामागे वेगवेगळी कारणे देखील असतात परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तोंडामध्ये अनावश्यक सूक्ष्म जीवांची वाढ (Bacteria in mouth) झाल्यामुळे अनेकदा घाणेरडा वास येऊ लागतो. जर आपण लहान मुलांना नेहमी दात घासण्यास (Brushing habit in kids) किंवा गुळण्या करायला सांगितल्यास ही दुर्गंधी दूर करता येऊ शकते. लहान मुले अनेक पदार्थ खातात त्यामुळे आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. जर तुमच्या मुलांच्या तोंडातून सुद्धा दुर्गंधी येत असेल तर या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अन्यथा भविष्यात वेगवेगळ्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतील. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या टिप्स त्यामुळे तुमच्या मुलांच्या तोंडातील घाणेरडा वास (Mouth smell) सहज दूर करता येऊ शकतो.
- स्वच्छता : बहुतेक वेळा लहान मुलांच्या तोंडाची आपण स्वच्छता व नीट देखभाल न केल्यामुळे तोंडातून घाण वास येऊ लागतो. जर तोंडाचे आरोग्य नीट ठेवल्यास व तोंडाची साफसफाई जर नीट केली नाही तर तोंडातून दुर्गंधी येणे हे यामागील एक महत्त्वाचे कारण मानले जाते. जर तुमचा मुलगा रोज दात घासण्याऐवजी केव्हातरीच दात घासत असेल तर हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. ब्रश न केल्यामुळे आपण जे काही पदार्थ खातो ते दातांमध्ये अडकून राहतात अशा वेळी तोंडामध्ये अनेक बॅक्टेरियाची वाढ होते व परिणामी भविष्यात दात किडतात. जर तुमच्या मुलाच्या तोंडाची दुर्गंधी दूर करायची असेल तर त्याला नेहमी दात घासायला सांगायला हवे.
- तोंड कोरडे पडणे : जर तुमच्या मुलाला बोट चोखणे किंवा हात चोखण्याची सवय असेल तर या सवयीमुळे मुलांचे तोंड कोरडे पडू लागते. तोंड कोरडे पडल्यामुळे आपल्या तोंडात अनेक बॅक्टेरिया निर्माण होतात. अनेकदा यामुळे तोंडातून घाणेरडा वास येऊ लागतो. एखादे बोट किंवा अंगठा वारंवार चोखल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बहुतेक वेळा अशा प्रकारच्या सवयीमुळे पोटाचे इन्फेक्शन देखील होऊ शकते म्हणूनच लहान मुलांना वारंवार पाणी प्यायला सांगणे जेणेकरून त्यांचे तोंड कोरडे पडणार नाही.
- जीभ स्वच्छ ठेवणे : लहान मुलांच्या चुकीच्या वर्तनामुळे दातच नाही तर जिभेवर सुद्धा चुकीचा परिणाम होताना पाहायला मिळतो. जीभ अशी जागा आहे जेथे सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणात होते म्हणूनच या सूक्ष्मजीवांची वाढ कमी करणं गरजेचे आहे. लहान मुलांना ब्रश करण्यासोबतच त्यांना जीभ नेहमी स्वच्छ करायला सांगितले पाहिजे. जीभ स्वच्छ करण्यासाठी बाजारात वेगळे उत्पादन देखील उपलब्ध आहेत. या उत्पादनाच्या मदतीने तुम्ही लहान मुलांचे आरोग्य चांगले राखू शकता.
- तोंडाने श्वास घेणे : अनेकदा लहान मुलांना तोंडाने श्वास घेण्याची सवय असते. बहुतेक वेळा लहान मुलांना सर्दी झाल्यामुळे नाक बंद होते, अशा वेळी लहान मुले तोंडाने श्वास घेतात परंतु असे केल्याने आपल्या तोंडाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. जर तुमच्या मुलाला सुद्धा तोंडाद्वारे श्वास घेण्याची सवय असेल तर अशा वेळी ही सवय अत्यंत चुकीची आहे. ही सवय दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
टिप : ही माहिती सर्व साधारणपणे सांगण्यात आलेली आहे. टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही. जर तुमच्या मुलाला कोणत्याही प्रकारचे लक्षणी जाणवल्यास तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या.
इतर बातम्या
Sugar level : सकाळी साखरेची पातळी किती असावी? जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी
Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…