AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून घ्या स्वत:ची काळजी; जाणून घ्या नेमके काय करावे लागेल

डेल्टा व्हेरियंटला B.1.617.2 या नावाने देखील ओळखले जाते. कोरोनाचा हा अत्यंत घातक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरतो.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून घ्या स्वत:ची काळजी; जाणून घ्या नेमके काय करावे लागेल
delta plus
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 7:39 AM

मुंबई : जग अजूनही कोरोना महामारीशी लढते आहे. कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्सनी जगापुढील महामारीच्या संकटाची तीव्रता कमी होऊ दिलेली नाही. वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये डेल्टा व्हेरियंट सर्वाधिक घातक आहे. गेल्या महिनाभरात संपूर्ण जगभरात जेवढे कोरोना रुग्ण आढळून आले, त्यामधील 75 टक्के लोकांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेनेच नुकतीच जाहीर केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाची भीती आणि दहशतीचे वातावरण कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आपण जरी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतले असले तरी आपल्याला काही विशिष्ट खबरदारी घेणे आवश्यक आहे. डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरतो. त्याची गंभीर लक्षणे असून लसीचे दोन्ही डोस प्राप्त झालेल्या लोकांनादेखील तो संक्रमित करतो. (Take care of yourself from the Delta variant of the Corona; know exactly what needs to be done)

डेल्टा व्हेरिएंट म्हणजे काय?

डेल्टा व्हेरियंटला B.1.617.2 या नावाने देखील ओळखले जाते. कोरोनाचा हा अत्यंत घातक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरतो. या स्ट्रेनमुळे स्पाइक प्रोटीनमध्ये उत्परिवर्तन घडते, ज्यामुळे मानवी पेशी सहज संक्रमित होतात. याचा अर्थ असा आहे की हा प्रकार अधिक संक्रामक आहे. या व्हेरिएंटपासून स्वत:चे संरक्षण करणे फार महत्वाचे आहे. अगदी लसीकरण केलेल्या लोकांना देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

काय करावे आणि काय करू नये?

तज्ज्ञांच्या मते, लसीकरण केलेल्या लोकांनी इतर लोकांना भेटणे आणि सामूहिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे सुरक्षित आहे. तथापि, सुरक्षितता राखण्यासाठी दोन डोस घेतलेल्या लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. पूर्णपणे लसीकरण केले असेल ते लोकच घराबाहेर पडण्याचा विचार करू शकतात. लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यास मदत करेल. जर तुम्हाला व्यायामशाळेत जायचे असेल तर गर्दी कमी असतानाच्या वेळेला प्राधान्य द्या.

जर तुम्ही लोकांना भेटण्याचा विचार करीत असाल तर आपण भेटत असलेल्या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का, याची खात्री करून घ्या. अन्यथा घरातच बैठक घेण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे. सध्यातरी कार्यालयांमध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये जाणे धोका ओढवू घेण्याचे कारण ठरू शकते. असे असतानाही तुम्हाला जर घराबाहेर पडायचेच असेल तर सार्वजनिक ठिकाणी काटेकोरपणे मास्क घाला, सामाजिक अंतर राखा आणि भेटीचे चांगले स्थान निवडा.

रुग्णालये आणि दुकानांमध्ये जाणे शक्यतो टाळा

कोरोनाचा संसर्ग अजूनही पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे सध्यातरी हॉस्पिटल, दुकाने आणि किराणा दुकानात जाणे टाळले पाहिजे. जर तुम्हाला याठिकाणी जायचे असेल तर कोरोना प्रोटोकॉलचे पालन करा. तसेच तुम्ही याठिकाणी कमीत कमी वेळेत काम पूर्ण करून माघारी फिरण्याचे नियोजन करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रवासाची योजना आखत असाल तर हे जाणून घ्या की लसीकरण केवळ संसर्गाची शक्यता कमी करते, परंतु संसर्गाचा धोका पूर्णपणे रोखत नाही. त्यामुळे बाहेर जाल, त्यावेळी कमी गर्दीर्ची ठिकाणे निवडा आणि सर्व आवश्यक काळजी घ्या. (Take care of yourself from the Delta variant of the Corona; know exactly what needs to be done)

इतर बातम्या

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले

Sangli Flood : कृष्णा, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ, सांगलीत मदतकार्यासाठी लष्कर पाचारण

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.