महिलांनो… या समस्येविषयी न लाजता बिनधास्त डाॅक्टरांना बोला, नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते!

महिला (Women) त्यांच्या आरोग्याबद्दल जास्त सर्तक नसतात. त्यामध्ये काही महिला लाजून आपल्याला शारीरिक समस्यांवर उघड बोलत नाहीत. यामुळे महिलांमध्ये शारीरिक समस्या (Physical problems) अधिक प्रमाणात असतात. मात्र, महिलांनी यावर उघडपणे बोलणे आवश्यक आहे.

महिलांनो... या समस्येविषयी न लाजता बिनधास्त डाॅक्टरांना बोला, नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते!
अचानक युरिन येण्याची समस्या आरोग्यासाठी धोकादायक
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:29 AM

मुंबई : महिला (Women) त्यांच्या आरोग्याबद्दल जास्त सर्तक नसतात. त्यामध्ये काही महिला लाजून आपल्या शारीरिक समस्यांवर उघड बोलत नाहीत. यामुळे महिलांमध्ये शारीरिक समस्या (Physical problems) अधिक प्रमाणात असतात. बऱ्याच महिलांना तुम्ही पाहिले असेल की, शिंकल्यानंतर किंवा जास्त जोरात हसल्यानंतर त्यालगेचच बाथरूमकडे पळत जातात. त्याचे कारण म्हणजे अनेक महिलांना जोरात हसल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर लगेचच लघवी (Bathroom) येते. सहसा याकडे जवळपास सर्वच महिला दुर्लक्ष करतात. मात्र, असे करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायकच आहे.

अत्यंत कमी वयाच्या मुलींना देखील समस्या

बऱ्याच महिलांना वाटते की, वाढलेल्या वयामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र अजिबात असे नसून काॅलेज आणि शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना देखील ही समस्या भेडसावत आहे. यूरोलॉजिक नर्सिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 25% पेक्षा जास्त हायस्कूल आणि कॉलेजमध्ये खेळाडू असलेल्या मुलींना ही समस्या आहे. हसल्यावर किंवा शिंकल्यावर अचानक युरिन येण्याची समस्या डाॅक्टरांना सांगणे अनेक महिला टाळतात.

अचानक येणाऱ्या युरिनमुळे अनेक समस्या 

कधी कधी खूप दाब आल्यानंतर युरिन बाहेर येऊ शकते. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे तणाव-असंयम, ज्यामध्ये मूत्रमार्ग बाहेर पडण्यापासून युरिन थांबवू शकत नाही. तसेच यामध्ये असंयम ओव्हरफ्लो ही देखील कारणे असू शकतात. अचानक येणाऱ्या युरिनमुळे अनेक महिला तर सार्वजनिक ठिकाणी जाणे देखील यामुळे टाळतात. कारण बऱ्याच वेळा लगेचच बाथरूममध्ये जाणे शक्य होत नाही आणि फजिती होते.

वाढलेले वजन देखील एक कारण

कमकुवत पेल्विक फ्लोर स्नायू, वजन वाढणे, शस्त्रक्रिया, वृद्धत्व किंवा प्रसूती ही काही याची सामान्य लक्षणे देखील आहेत. मात्र, आपण जर योग्य वेळी डाॅक्टरांचा सल्ला घेतला तर ही समस्या काही महिन्यांमध्ये देखील दूर होण्यास मदत होते. सहसा अचानक युरिन येणाची मुख्य समस्या वाढलेल्या वजनामुळे निर्माण होते. अशावेळी डाॅक्टर काही डाएट वगैरे देऊन ही समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. जर आपल्याला देखील ही समस्या जाणवत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला लवकरात-लवकर घ्यावा.

महिलांनो डाॅक्टरांनी बिनधास्त चर्चा करा! 

अमेरिकेतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ जेसिका शेफर्ड म्हणतात की, बऱ्याच महिला लाजून डाॅक्टरांकडे येणे टाळतात. यामुळे यावर उपचार करण्यास खूप जास्त उशीर होतो. डॉक्टर तुमचा आहार, औषधे, सवयी आणि लघवी तपासतात आणि तुम्हाला योग्य उपचार देतात. यूटीआय संसर्ग, मधुमेह आणि बद्धकोष्ठता यामुळेही ही समस्या उद्भवते. त्यामुळे या आजारावरही उपचार करणे आवश्यक आहे. अल्कोहोल, कॅफीन, साखरयुक्त पेय आणि मसालेदार अन्न देखील ही समस्या वाढवतात. आजतकने यासंदर्भात सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss: खरोखरच ब्राऊन राईसचा आहारात समावेश केल्याने वजन कमी होते? वाचा रिअल फॅक्ट…

Child care : लहान मुलांच्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे उपाय करा, तोंड नेहमी राहील निरोगी!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.