Oil | शरीरातील समस्या दूर करा फक्त तेलाच्या मदतीने! घरात असायलाच हवे असे तेलाचे 5 प्रकार

तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. तेलाच्या वापराने अनेक वेदना दूर होऊन शरीरातील मांस पेशीच्या वेदना दूर होऊन आपल्याला उत्तम आरोग्य लाभते.

Oil | शरीरातील समस्या दूर करा फक्त तेलाच्या मदतीने! घरात असायलाच हवे असे तेलाचे 5 प्रकार
तेलाच्या या प्रकारांबाबत आणि त्यांच्या उपयोगांबाबत तुम्हाला माहीत आहे?
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 7:13 PM

आपले शरीर मजबूत व तंदुरुस्त राखण्यासाठी जसे अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे शरीराच्या जडण घडणीसाठी काही स्निग्ध पदार्थांची देखील गरज असते.आपले आयुर्वेदिक शास्त्र (Ayurvedic science) हे संपन्न असे शास्त्र आहे. या शास्त्रांमध्ये अनेक औषधी गुणधर्मांनी उपयुक्त असणारे पदार्थ व त्यांचे औषधी गुणधर्म आपल्याला सांगण्यात आलेले आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण तेलाचा (essential oil) प्रामुख्याने वापर करत असतो. अनेकदा तेल जेवनामध्ये वापरत असतो तर अनेकदा तेलाचा उपयोग शरीरावरील अनेक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा होत असतो. आपल्यापैकी अनेक जण केसांची निगा राखण्यासाठी तेल वापरतात परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपण आज पाच प्रकारच्या (5 Types of oil) तेलांबाबत जाणून घेणार आहोत, जे तेल प्रत्येकानं घरात बाळगणं शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतं.

नेहमी तेलाचा वापर केल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व प्राप्त होतात. या पोषक तत्वाच्या साह्याने आपली त्वचा कोरडी झाली असेल तर ती मऊ -कोमल मुलायम बनते तसेच शरीरावर कोणत्याही प्रकारचे त्वचाविकारही झाला असेल तर तो सुद्धा दूर होतो, चला तर मग जाणून घेऊया या तेलांमुळे आपल्याला आरोग्याचे (health benefits) कोण कोणते लाभ होतात त्याबद्दल..

  1. लव्हेंडर तेल : लव्हेंडर तेलामध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म असतात.या तेलात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म सुद्धा असतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर करण्याची शक्ती या तेलात असते. जर तुम्हाला चटका लागला असेल अशावेळी भाजलेल्या जागेवर हे तेल लावल्यास आपल्याला जळण होत नाही. या तेलाचा वापर केल्याने ज्या ठिकाणी भाजले आहे अशा ठिकाणी फोड सुद्धा येत नाही. आंघोळ करतेवेळी पाण्यामध्ये जर आपण या तेलाचे दोन ते तीन थेंब टाकल्यास आपल्याला मानसिक शांतता मिळते व संपूर्ण तणाव निघून जातो.
  2. निलगिरी तेल : निलगिरीचे पान,फळ, साल मानवी शरीरासाठी उपयोगी मानण्यात आलेले आहे. या निलगिरीच्या पानांपासून तेलाची निर्मिती देखील केली जाते. निलगिरीच्या तेलामध्ये उष्णता गुणधर्म प्रदान करण्याची शक्ती असते. तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये कफ साचलेला असेल तर अशा व्यक्तींसाठी निलगिरीचे तेल लाभदायी ठरते. या तेलाचे दोन थेंब आपण पाण्यामध्ये टाकून या पाण्याने वाफ घेतल्यास बंद झालेले नाक मोकळे होते व तुमची सर्दी लगेच पळून जाते.
  3. पुदिना तेल : जर तुम्हाला डोकेदुखी वारंवार त्रास देत असेल तर अशा वेळी आपण कोणत्याही तेलामध्ये पुदिना तेलाचे दोन थेंब टाकून हे तेल कपाळास लावल्यास आपल्याला फरक जाणवतो.या तेलाने हलका मसाज केला तरी डोकेदुखी पळून जाते.सूज, मांस पेशी वेदना , मांस पेशी आखडणे यासारख्या समस्या देखील दूर होतात.
  4. लिंबाचे तेल : लिंबाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहे. लिंबू मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी ची मात्रा उपलब्ध असते. लिंबूचे आपण अनेकदा लोणचे देखील खातो परंतु लिंबू द्वारे बनवले गेलेले तेल सुद्धा आपल्या शरीरासाठी गुणकारी ठरते. लिंबूच्या तेलामध्ये अँटीमायक्रोबियल एजंट असतात. जे आपल्याला तणावातून मुक्त करण्यास मदत करतात. या तेलाचेवएक ते दोन थेंब सेवन केल्यास आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आपली त्वचा मॉइश्चराइज करण्यासाठी व नैसर्गिक चमक मिळण्यासाठी हे तेल मदत करते.
  5. चहा पत्तीचे तेल : चहा पत्तीच्या तेलामध्ये अँटी बॅक्टरियल घटक असतात. जर शरीरावर खाज,फोड्या,जखम झाली असेल,एखादा कीटक चावला असेल,उन्हात चेहरा काळा पडला असेल,खरूज, नायटा झाला असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे तेल लाभदायक ठरते.

संबंधित बातम्या :

या रंगाची लघवी होते…मग सावधान, तुम्हाला हा आजार असण्याची शक्यता

काय तुमची मासिक पाळी अजून आली नाही…मग ही धोक्याची घंटा

रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.