Side Effect of Skipping Dinner : वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीही करताय का ही चूक? व्हा सावध, अन्यथा होईल गंभीर नुकसान

वजन नियंत्रित करण्यासाठी बरेच लोक रात्रीचे जेवण करत नाहीत, यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. म्हणूनच रात्रीचे जेवण कधीही टाळू नये.

Side Effect of Skipping Dinner : वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीही करताय का ही चूक? व्हा सावध, अन्यथा होईल गंभीर नुकसान
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 10:13 AM

नवी दिल्ली – वजन कमी (weight loss) करणाऱ्यांना डाएटिंग (dieting) आणि उपवास करण्याची पद्धत सर्वात सोपी वाटते. तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच दिसतो, पण तो सकारात्मक कमी आणि जास्त नकारात्मक असतो. कारण अन्नं न खाल्ल्याने शरीरासोबतच मनावरही परिणाम होतो. जिथे शारीरिक दुर्बलतेची भावना असते, तिथे मानसिकदृष्ट्या व्यक्ती चिडचिड होते. त्यामुळे वजन नियंत्रणाच्या प्रक्रियेत कोणतेही जेवण करणे (dont skip meals) टाळू नका, मग ते रात्रीचे असले तरीही. त्याऐवजी तुम्ही हलकं-फुलकं काही खाऊ शकता, तो एक चांगला पर्याय आहे. बरेच जण रात्रीचे जेवण करणे टाळतात, पण त्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते ते जाणून घेऊया.

होऊ शकतो पोटदुखीचा त्रास

जे लोक रात्रीचे जेवण करत नाहीत, त्यांना अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र असते की ती सहन करणे कठीण होते. त्यामुळे रात्रीचे जेवण करणे टाळण्यापेक्षा त्यावेळी हलके अन्न घेणे चांगले. तुम्ही फायबर युक्त पदार्थ खाऊ शकता. एक वाटी वरण किंवा उकडलेल्या भाज्यांचे सेवन तुम्ही करू शकता. रात्रीच्या जेवणात असे खाद्यपदार्थ निवडा, जे सहज पचतील आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

हे सुद्धा वाचा

अशक्तपणा येऊ शकतो

एक-दोन दिवस रात्रीचे जेवण जेवला नाहीत तर फारसा फरक पडत नाही, परंतु दररोज असे केल्याने अशक्तपणा येऊ शकतो. खरंतर ज्यांना लठ्ठपणा किंवा वजन कमी करायचे असते, तेच लोक रात्रीचे जेवण वगळतात. रात्रीच्या जेवणासोबतच अनेक वेळा ते नाश्ता करणेही टाळतात. मात्र या चक्रात शरीर कमकुवत होते. तुमच्या या सवयीचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

झोप न येण्याची समस्या वाढू शकते

या सर्व गोष्टींशिवाय रात्री जेवण न केल्यामुळे झोप न येण्याची समस्याही वाढू शकते. कारण जसजशी रात्र वाढत जाते तसतशी भूक लागते, त्यामुळे अनेकदा पोटात तीव्र वेदना होतात. अशा स्थितीत झोप येत नसेल किंवा झोप लागली तर भुकेमुळे पुन्हा झोप जाग येते. शांत झोप न लागल्याने किंवा अपूर्ण झोपेमुळे आपली संपूर्ण दिनचर्या बिघडते.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.