Calcium Deficiency: कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होतात गंभीर परिणाम, उद्भवू शकतात ‘या’ समस्या

शरीरात कॅल्शिअमची कमतरता असेल तर अनेक आजार होऊ शकतात. ही कमतरता दूर करण्यासाठी कॅल्शिअमने युक्त असलेल्या अनेक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.

Calcium Deficiency: कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होतात गंभीर परिणाम, उद्भवू शकतात 'या' समस्या
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 10:38 AM

नवी दिल्ली – आपल्या आरोग्यासाठी कॅल्शिअम (calcium) अतिशय आवश्यक असते. कॅल्शिअममुळे दात आणि हाडे बळकट (teeth and bones) राहण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर शरीराचा विकास आणि स्नायूंच्या निर्मितीमध्येही कॅल्शिअमची महत्वपूर्ण भूमिका असते. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीरात या जीवनसत्वाची (calcium deficiency) कमतरता असेल तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हृदय आणि मेंदू यांच्यावरही परिणाम होऊ शकतो. आजकाल हायपोकॅलसेमियाचे रुग्णही वाढत आहेत. खरंतर हा आजार कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होतो. या परिस्थितीमध्ये रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण खूपच कमी होते.

खाण्यापिण्याची योग्य काळजी न घेणे, पौष्टिक आहाराचा अभाव या कारणांमुळे शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते. वाढते वय, हार्मोनल बदल यामुळेही कॅल्शिअमची कमतरता निर्माण होऊ शकते.

ही आहेत कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे –

हे सुद्धा वाचा

– चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे

– कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे नखं कमकुवत होतात, सहज तुटतात.

– केसगळतीचे कारणही कॅल्शिअमची कमतरता हे असू शकते.

– उठता – बसताना आणि चालतान वेदना होणे

– स्नायू ताणल्यासारखे वाटणे.

– दातांसंदर्भात समस्या निर्माण होणे.

कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी खा हे पदार्थ

– दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी दररोज दूध पिणे, पनीर, दही अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

– जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. कोबी, ब्रोकोली, पालक या भाज्यांचे सेवन करावे.

– अंड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, त्याचे सेवन केल्याने कॅल्शिअमची कमतरता दूर होऊ शकते.

– सोयाबीन हेही कॅल्शिअमचे उत्तम स्त्रोत मानले जाते. त्यामध्ये प्रोटीन्सही असतात. तुम्ही सोयाबीनचाही आहारात समावेश करू शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....