Health : ‘या’ वाईट असतील वेळीच सुधारा, नाहीतर होईल थेट किडनीवर परिणाम?
आपल्याच अशा वाईट सवयींबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या किडनीला नुकसान सहन करावे लागते. या वाईट सवय कोणत्या याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : सध्या धावपळीच्या जगात लोक आपल्या शरीराकडे नीट लक्ष देत नाहीत. मग शरीराकडे लक्ष न देणं, चुकीच्या सवयी अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांना किडनीचा त्रास निर्माण होतो. किडनी हा शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवायचे असेल तर त्यासाठी किडनी देखील निरोगी असणे खूप गरजेचे असते.
किडनी ही आपल्या शरीरातील घाणेरडे पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. पण किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर ती निकामी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. आणि जर ती निकामी झाली तर आपल्याला अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.
1. कमी पाणी पिणे – डॉक्टर हे प्रत्येक व्यक्तीला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला नेहमी देतात. पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. तुम्ही जितके जास्त पाणी प्यायचे तितके तुमचे शरीर हायड्रेट राहते. जर तुम्हाला तुमची किडनी निरोगी ठेवायचे असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. यामुळे तुमची किडनी खराब होऊ शकते किंवा ती नीट काम करू शकत नाही.
2. लघवी रोखून धरणे- आजकाल बहुतेक लोक हे काही कामासाठी बाहेरगावी प्रवास करतात किंवा बाहेर फिरायला जाताना लोक लघवी रोखून धरतात. महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. महिलांना बाहेर कुठे जाताना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह मिळत नाही, त्यामुळे त्या लघवी रोखून धरतात. पण हे शरीरासाठी योग्य नाही यामुळे तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते.
3. फास्टफूड अतिप्रमाणात खाणे- आजकालच्या लोकांना बाहेरचे फास्टफूड खायला भरपूर आवडते. त्यामुळे कुठेही फिरायला जाताना किंवा कामाला जाताना लोक फास्टफूडवर ताव करताना दिसतातच. पण फास्टफूड सारखे अन्न आपल्या शरीरासाठी घातक ठरते असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर त्याचा आपल्या किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे फास्टफूड खाणं मोठ्या प्रमाणात टाळा आणि पौष्टिक अन्नाचा समावेश तुमच्या आहारात करा. यामुळे तुमची किडनी निरोगी राहण्यास मदत होईल.