खाण्या-पिण्यानेही दूर होऊ शकते नैराश्य, ‘ या ‘ पदार्थांचा करा आहारात समावेश
स्ट्रेस अथवा तणाव होणे, हे आजकाल खूप कॉमन आहे. मात्र तो वाढला तर डिप्रेशन (नैराश्य) सारख्या गंभीर मानसिक आजाराचे कारण बनू शकते.
स्ट्रेस अथवा तणाव (stress) होणे, हे आजकाल खूप कॉमन आहे. मात्र तो वाढला तर डिप्रेशन सारख्या गंभीर मानसिक आजाराचे (mental health) कारण बनू शकते. नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती आयुष्याच्या त्या वाईट अवस्थेतून जात असते, ज्यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. मेडिटेशन, योगासने आणि औषधे यांसह काही खाद्यपदार्थांचे (food) सेवन करणेही नैराश्यावर मात करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. अन्नपदार्थांद्वारेही नैराश्य दूर करता येऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? डिप्रेशन टाळायचं असेल तर या नैराश्यविरोधी पदार्थांचा आहारात समावेश करावा. अँटी-डिप्रेसंट (anti-depressant) गुणधर्म असलेल्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
चिया सीड्स :
शरीराच्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, आपण चिया सीड्सचे सेवन केले पाहिजे. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अमिनो ॲसिड, लोह आणि व्हिटॅमिन बी यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. चिया सीड्सचे सेवन केल्याने मेंदूत असलेल्या रसायनाचे उत्पादन योग्य होते आणि तसे झाले की मूडही चांगला होऊ लागतो.
रताळं :
रताळं हा एक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये कार्ब्ससारख्या पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. तणाव दूर करण्यासाठी तुम्ही रताळ्याचे सेवन करू शकता. रताळं हे केवळ नैराश्यापासून संरक्षण देत नाही, तर त्यात चिंता दूर करण्याचे गुणधर्म देखील आहेत. तसेच ते खाल्ल्याने मूडही रिफ्रेश होऊ लागतो, कारण ते अतिशय चविष्ट असतं
ब्रोकोली :
ब्रोकोली ही आपल्या आरोग्यासाठी वरदना आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन बी 6 पासून प्रोटीन ते कॅल्शियमपर्यंत अनेक पोषक तत्वं असतात. हे असे आवश्यक पोषक घटक आहेत ज्यामुळे आपण रिलॅक्स होतो व आपला मूड चांगला होतो. ब्रोकोलीचे आरोग्याला इतरही अनेक फायदे आहेत.
चॉकलेट :
डार्क चॉकलेट हे आपला स्ट्रेस /तणाव कमी करण्याचे काम करते, असे संशोधनातून समोर आले आहे. जगात फारच कमी व्यक्ती असतील ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. आपला मूड फ्रेश करण्यासाठी किंवा ताण कमी करण्यासाठी डॉक्टरही चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात.