ही 5 लक्षणे दर्शवितात महिलांमध्ये चांगली प्रजननक्षमता, जाणून घ्या तुमची गर्भधारणा कठीण असेल की सोपी ?

खराब जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होत आहे. ज्यामुळे अनेक महिलांना गर्भधारणा होताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

ही 5 लक्षणे दर्शवितात महिलांमध्ये चांगली प्रजननक्षमता, जाणून घ्या तुमची गर्भधारणा कठीण असेल की सोपी ?
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 3:12 PM

मुंबईः पौगंडावस्थेतील कोणत्याही मुलीसाठी, एखाद्या नातेसंबंधातून गर्भवती होणे (pregnancy) ही खूप भीतीदायक बातमी असू शकते. जेव्हा तिच मुलगी 20 ते 25 वर्षांची असते, तेव्हा ती नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी वेगळ्या मार्गांचा विचार करते. आणि मैत्रिणींशीही चर्चा करते. मात्र काही काळानंतर , गर्भधारणा होणे हे (being pregnant) त्याच मुलीसाठी जगातील अतिशय महत्वाची गोष्ट ठरते. त्या मुलीला लवकरात लवकर आई बनण्याची इच्छा असते. आई होणं, (motherhood) हे जगातील प्रत्येक महिलेसाठी एक सुंदर आणि आनंददायी अनुभव असतो. मात्र त्यासोबतच अनेक आव्हाने आणि कठीण परिस्थितींशी सामना करावा लागू शकतो.

आजच्या काळात खराब जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होत आहे.

ज्यामुळे अनेक महिलांना गर्भधारणा होताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर काही महिला अतिशय सहजपणे गर्भवती होत आहे. अशा वेळी तुम्हाला काही लक्षणांबद्दल सांगत आहोत, ज्यावरून तुमची प्रजननक्षमता किती चांगली आहे, हे समजू शकेल.

1) तुमचे वय 20 ते 25 दरम्यान असेल –

आत्तापर्यंत जगभरात करण्यात आलेल्या संशोधनातून माहिती समोर आली आहे की 20 ते 24 वयोगटातील कोणत्याही महिलेची प्रजननक्षमता सर्वात चांगली असते.

खरंतर प्रजननाची वयोमर्यादा सर्व स्त्रियांसाठी समान नसते व त्यामध्ये फरक असू शकतो. मात्र अनेक संशोधनातून ही माहिती समोर आली आहे की जसंजसं वय वाढतं तशी प्रजननक्षमता हळूहळू कमी होत जाते.

2) मासिक पाळी नियमित असेल –

सर्व स्त्रियांच्या मासिक पाळीच्या चक्रात कधी न कधी अनियमितता येते, ही सामान्य बाब आहे. मात्र त्यामध्ये जास्त गडबड असल्यास ती टेन्शनची गोष्ट आहे.

जर तुमची मासिक पाळी दर महिन्याला नियमितपणे येत असेल तर ते प्रजनन क्षमता चांगली असल्याचे लक्षण आहे.

3) गुणसूत्र –

गर्भावस्थेबाबत बोलताना तुम्ही दुसऱ्या महिलांकडून त्यांच्या अथवा त्यांच्या जवळच्या लोकांना गर्भधारणेत येणाऱ्या अडचणींबद्दल ऐकले असेल. मात्र कौटुंबिक इतिहासाच्या आधारे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेबद्दल अंदाज लावणे खूप कठीण आहे.

4) व्हजायनल डिस्चार्ज –

जर मासिक पाळी दरम्यान योनीतून स्वच्छ, दुर्गंध नसलेला डिस्चार्ज (स्त्राव) होत असेल, तर ते चांगले लक्षण आहे. याचा अर्थ असा आहे की गर्भाशय (स्पर्म) शुक्राणूंना सहजपणे हलवण्यास आणि रोपण (implatation) करण्यास मदत करते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी हे खूप महत्वाचे ठरते.

5) PMS (प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम) ची लक्षणे

प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम दरम्यान मूड स्विंग्स, सतत खाण्याची इच्छा होणे, ओटीपोटात वेदना होणे, थकवा, चिडचिड आणि नैराश्य ही लक्षणे दिसतात.

प्रत्येकी 4 महिलांपैकी 3 महिलांना मासिक पाळीदरम्यान वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी काही ना काही त्रास होतो. ही लक्षणे जरी तुम्हाला आवडत नसली तरी हे प्रजनन क्षमतेचे लक्षण आहे.

या लक्षणांचा अर्थ असा, की तुमचे शरीर जसे पाहिजे तसे कार्य करीत आहे. मात्र , खूप वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.