मुंबई : दातदुखी ही एक तशी सामान्य समस्या आहे. बऱ्याच वेळा थंड किंवा गरम गोष्टी खाण्यामुळे दात दुखतात. यामुळे हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज येते. कधीकधी दातदुखी इतकी वाढते की खाणे -पिणे कठीण होते. या दातदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा औषधे घेतो. पण प्रत्येक वेळा औषध घेणे योग्य नाही. दातदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (This home remedy is beneficial for relieving toothache)
मीठाचे पाणी
घसा खवखवणे, खोकला आणि दातदुखी दूर करण्यासाठी मीठाचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक कप कोमट पाणी घ्यावे लागेल आणि त्यात थोडे मीठ मिसळावे लागेल. त्यानंतर या पाण्याने गुळण्या करा. हे तोंडाचे संक्रमण कमी करून वेदना कमी करण्यास मदत करते. जर हे करूनही वेदना कमी झाल्या नाहीतर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लवंग
दातदुखीवर लवंग हा एक जुना उपाय आहे. हे केवळ वेदना कमी करत नाही तर सूज देखील कमी करते. वेदनेपासून आराम मिळविण्यासाठी आपण अनेक प्रकारे लवंग वापरू शकता. यासाठी आपण लवंगची गरम चहाचे सेवन करु शकता. याशिवाय बाधित भागाला तुम्ही लवंग तेल लावू शकता.
लसूण
भारतीय पाककृतीतील हे सामान्य घटक दातदुखीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे बॅक्टेरिया नष्ट करू शकतात आणि वेदना कमी करणारे म्हणून कार्य करतात. आपण लसूण चहा बनवू शकता किंवा लसणाच्या ताज्या पाकळीचे सेवन करु शकता. आपण प्रभावित क्षेत्रावर लसूण पेस्ट देखील लावू शकता.
बेकिंग सोडा लावा
बेकिंग सोड्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टीक गुणधर्म असतात. कोमट पाण्यात बेकिंग सोडा टाकून गुळण्या करा. यामुळे दातातील वेदना कमी होतील. याशिवाय तुम्ही कापसामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकून वेदना होत असलेल्या दातावर ठेवू शकता.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(This home remedy is beneficial for relieving toothache)