गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल

पहिल्यांदा मातृत्वाचा आनंद घेत असलेल्या मातांना गर्भधारणेतील सर्व अनुभव हे नवीन असतात. त्यामुळे त्याच्या मनात अनेक शंकांनी घर केलेले असते. अनेकदा मातृत्वासंबंधित लक्षणांमुळे महिला चिंतीत होत असतात. हा काही वेगळा त्रास तर नाही ना? असे अनेक प्रश्‍न त्यांच्या मनात निर्माण होत असतात. गर्भधारणेमधील पहिल्या तीन महिन्यातील काही लक्षणं हे अगदी सामान्य असतात. त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नसते.

गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य...असे होतात शारीरिक बदल
health
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 9:44 AM

मुंबई : गर्भधारणेनंतर (Pregnancy) महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे अनेक महिला या त्रासाने किंवा लक्षणांनी (Symptoms) चिंतीत होत असतात. अनेकदा हार्मोनल बदल झाल्यावर विविध समस्या निर्माण होत असतात. परंतु ज्या महिला पहिल्यांदा गर्भवती राहत आहेत, त्यांच्यासाठी हे सर्व बदल नवीन असतात. त्यामुळे संबंधित महिला अधिकच तणावात जात असतात. परंतु गर्भधारणेत काही लक्षणं हे अगदी सामान्य असतात. गर्भधारणेच्या प्रक्रियेतील तो एक भाग असतो. त्यामुळे त्याच्यामुळे चिंतीत होण्याचे काहीही कारण नसते. जर तूम्ही पहिल्यांदा आई होणार असाल तर, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये (first three months of pregnancy) होणार्या बदलांची तुम्हाला माहिती असायलाच हवी.

मासिक पाळी चुकणे

मासिक पाळी चुकने हे गर्भधारणेचे प्रमुख लक्षणांमधील एक लक्षण आहे. जर एक आठवड्याहून अधिक वेळ होउनही तुमची नियमित मासिक पाळी आली नाही, तेव्हा तुम्ही गर्भधारणेबाबत चाचणी करणे आवश्‍यक ठरते. मासिक पाळी चुकने हे गर्भधारणेचे प्रमुख लक्षण आहे.

मासिक पाळीसारखा त्रास होणे

मासिक पाळीला जसा त्रास होतो, तसा त्रास होणे हे गर्भधारणेचे एक प्रमुख लक्षण आहे. असे लक्षण दिसताच अनेक महिलांच्या मनात याबाबत भीती निर्माण होत असते. मासिक पाळीची सुरुवात तर होणार नाही? अशी भीती त्यांच्या मनात असते. गर्भधारणेत पोटात काही प्रमाणात दुखणे हे सामान्य आहे, पोटातील गर्भाची वाढ होत असल्याने त्यातून हा त्रास होण्याची शक्यता असते. परंतु तुमच्या अंगावरुन रक्त जात असेल, किंवा खूप जास्त पोटात दुखत असेल तर मात्र तुम्ही तज्ज्ञांना याबाबत सांगितले पाहिजे.

स्तनात त्रास होणे

गर्भधारणेच्या काळात शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे शरीराच्या रचनेतही अनेक बदल जाणवत असतात. त्यातलाच एक भाग म्हणजे, स्तनामध्ये जडपणा येणे. त्यासोबत यात काही वेळा दुखण्याचा त्रासदेखील वाटू शकतो. परंतु ही एक सामान्य समस्या आहेत. हळूहळू यात बदल होउन ते बरे होते.

मळमळ होणे

गर्भधारणेच्या पहिल्या काही दिवसांमध्ये उल्टी, मळमळ आदी समस्या सामान्य आहेत. प्रेग्नंसी हार्मोन एस्ट्रोजनच्या वाढण्यामुळे उल्टी किंवा मळमळ ही समस्या निर्माण होत असते.

वास येणे

अनेकदा महिलांना गर्भधारणेत असताना खाण्याच्या वस्तूंचा वास येउ लागतो. त्यामुळे त्यांना जेवण करण्याचीही इच्छा होत नसते. सर्वच गोष्टींचा वास येत असल्याने त्यांची खाण्याची इच्छा कमी होत असते. याशिवाय वारंवार लघवीला जाणे, किंवा हलका ताप येणे आदी लक्षणंही दिसू शकतात.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टारांचा सल्ला घेणे फायदेशीर)

संबंधित बातम्या :

Weight Loss : फक्त या 4 गोष्टी काटेकोरपणे पाळा, पाहा वजन कसे झटपट कमी होते!

Health Care Tips : निरोगी आयुष्य जगण्यासाठी या 3 जीवनसत्त्वांचा आहारात समावेश हवाच!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.