घसा खवखवण्याच्या समस्यांपासून या घरगुती उपायांनी आराम मिळवा

बदलत्या हवामानामुळे अनेकवेळा सर्दी, खोकला, घसादुखीचा सामना करावा लागतो. याला तोंड देण्यासाठी अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागत असतात. परंतु काही वेळा घरगुती उपायांमुळेही या समस्येपासून सुटका होऊ शकते.

घसा खवखवण्याच्या समस्यांपासून या घरगुती उपायांनी आराम मिळवा
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:09 PM

मुंबईः बदलत्या ऋतूमुळे अनेकांना शारीरिक व्याधींचा त्रास सहन करावा लागत असतो. हिवाळ्यात अनेकदा सर्दी किंवा खोकल्यामुळे (Cough) घसा खवखवण्याची समस्या निर्माण होत असते. कोरोना काळातदेखील अनेकांना घसा खवखवण्याच्या (sore throat) समस्यांचा सामना करावा लागला होता. गळ्यातील इन्फेक्शनमुळेही अनेकदा हा त्रास सहन करावा लागत असतो. औषधोपचार घेऊनही याला बरं होण्यास बराच अवधी लागत असतो. घशाच्या समस्यांसाठी अनेकदा घरगुती उपचारदेखील (home remedies) फायदेशीर ठरत असतात. कोरोना काळातदेखील अनेकांनी घरगुती उपचाराच्या माध्यमातून घशाच्या दुखण्यावर मात केली होती. यामुळे लवकर आराम मिळत असतो. काळी मिरी आणि मध, आले, सफरचंद सायडर व्हिनेगर, हळद, आवळा आणि लवंग आदींच्या माध्यमातून आपण तत्काळ घशांच्या समस्येवर मात करू शकतो.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने घशातील अनेक छोटी-मोठी दुखणी नाहीशी होऊन त्वरित आराम मिळतो. एक ग्लास पाणी कोमट करुन त्यात एक चमचा मीठ घाला आणि चांगले मिसळा. मिठाच्या पाण्याचा एक घोट घेऊन साधारणतः 10 सेकंद गुळण्या करा. दिवसातून दोन-तीन वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाला त्वरित आराम मिळतो.

काळी मिरी आणि मध

काळी मिरी आणि मध यांचे मिश्रण हा घशांच्या आजारावर एक गुणकारी व जुना उपाय आहे. हे घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला आदींवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. मध हे नैसर्गिक खोकला शमन करणारे असून त्यामुळे घशाला त्वरित आराम मिळतो. काळी मिरी आणि मधाच्या मिश्रणातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म अनेक संक्रमणांशी लढतात.

आलं

आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असलेले घटक असतात. घशासंबंधी अनेक आजारांवर आलं उपयुक्त ठरत असते. यासाठी आले खिसून पॅनमध्ये ठेवा. आता त्यात एक ग्लास पाणी घालून उकळी आणा. सुमारे 5 मिनिटे उकळवा. आल्याचे पाणी गाळून त्याचे सेवन करा, यातून घशाला आराम मिळतो.

सफरचंद व्हिनेगर

सफरचंद सायडर व्हिनेगर प्यायल्याने घसा खवखवण्यापासून आराम मिळतो. याच्या सेवनामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. ते थोडे थंड होऊ द्या आणि रिकाम्या पोटी प्या.

मुळेथी

मुळेथी हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. मुळेथीत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. घशाच्या दुखण्यावर मुळेथी हा एक चांगला पर्याय आहे. अपचन, बद्धकोष्ठता, पोटात अल्सर आणि इतर अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास यातून मदत मिळते. एका पॅनमध्ये एक ग्लास पाण्यात एक मुळेथीचे मूळ टाका त्याला 5 मिनिटे उकळू द्या आणि नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे, नंतर मुळेथीचा चहा प्यावा, यातून घशाला आराम मिळून घशाची खवखव त्वरित कमी होईल.

संबंधित बातम्या

Health care : कॅल्शियम व्यतिरिक्त हे 5 पोषक घटक हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर, वाचा अत्यंत महत्वाची माहीती!

हार्टअटॅक येऊ नये, असं वाटत असेल, तर मग ही माहिती जाणून घेणं फार फार महत्त्वाचंय!

न्यूमोनिया झाल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवलंय! अशा वेळी आयुर्वेदिक उपचार पद्धती गुणकारी ठरते?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.