थंडा थंडा, कूल कूल… थंड पाण्यामुळे घटते वजन ? वेट लॉसच्या या 4 लॉजिकबद्दल कधी विचार केला आहे का ?

एक संशोधन समोर आले आहे, त्यामध्ये थंड पाण्यामुळे वजन कमी होण्याचा उल्लेख केला आहे. असे म्हटले जाते की थंड पाण्याचा शरीराच्या तापमानावर परिणाम होतो आणि त्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारू शकतो. अशाच काही खास आरोग्यविषयक कल्पनांबद्दल जाणून घ्या.

थंडा थंडा, कूल कूल... थंड पाण्यामुळे घटते वजन  ? वेट लॉसच्या या 4 लॉजिकबद्दल कधी विचार केला आहे का ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 7:49 AM

नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी अनेक लोक विविध उपाय करत असतात. कोणी डाएट करत आहारावर नियंत्रण ठेवतात तर कोणी कठोर मेहनत करून व्यायामाच्या सहाय्याने वजन घटवण्याचा (Weight loss) प्रयत्न करतात. पण वजन कमी करण्यासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. थंड पाण्याने अंघोळ (cold water shower) केल्याने वजन कमी होते, हे तुम्हाला माहित आहे का ? एक संशोधन समोर आले आहे ज्यामध्ये अशाच अनोख्या आरोग्यविषयक कल्पनांबद्दल सांगण्यात आले आहे. एका बातमीनुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान बदलते आणि त्यामुळे आपले मेटाबॉलिज्म (metabolism) सुधारण्यास सुरुवात होते. मेटाबॉलिज्म दर योग्य ठेवल्याने वजन कमी करणे सोपे होते हे आपणा सर्वांनाच माहीत असते.

बातम्यांनुसार, संशोधकांमध्ये कॅलरी बर्न टिप्सबाबत (Calorie burn tips) वाद सुरू होता. काहींचा असा विश्वास आहे की 15 मिनिटे थंड पाण्याच्या शॉवरखाली अंघोळ केल्याने 62 कॅलरीज बर्न होऊ शकतात, तर काहीजणांचे असे म्हणणे आहे की, या पद्धतीमुळे काही फरक पडत नाही.

तसेच, या संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की थंड पाण्याने आंघोळ केल्याने झोपेची गुणवत्तादेखील देखील सुधारली जाऊ शकते. अशाच काही दैनंदिन सवयींबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही कॅलरी जलद बर्न करू शकता आणि गोड खाणं सोडण्याची परिस्थिती उद्भवणार नाही.

हे सुद्धा वाचा

घर ठेवा साफ

प्रत्येक व्यक्तीला ला जिम किंवा वर्कआउटसाठी वेळ काढणे शक्य नसते. तरीही वजन कमी करायचं असेल तर रोज घर स्वच्छ करायला हवं. तंदुरुस्त राहण्यासाठी, खाली वाकून लादी पुसणे, केर काढणे, आणि घर झाडणे यासारख्या शारीरिक हालचाली दररोज करता येऊ शकतात. त्यामुळे तुमचं घर तर स्वच्छ होतंच पण शारीरिक हालचाल होऊन वजन कमी होण्यासही मदत होते.

सेलेरीचे करा सेवन

2012 साली एका अभ्यासातून अशी माहिती समोर आली होती, त्यानुसार 100 ग्रॅम सेलेरीमध्ये फक्त 2 कॅलरीज असतात. एका व्यक्तीने नियमितपणे सेलेरी खाणे सुरू केले आणि असे केल्याने त्याला कॅलरीज बर्न करण्यास मदत झाली. त्यामुळे वजन घटवायचे असेल तर अन्य उपायांसोबतच तुम्ही सेलेरीही खाऊ शकता. मात्र तुम्हाला अशा काही पदार्थांची ॲलर्जी असेल तर आधी डॉक्टरांशी बोलून त्यांचा सल्ला घेणे इष्ट ठरते.

शॉपिंग करणे

शॉपिंगचा आणि वजन कमी करण्याचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण त्याच संबंध आहे. बाजारात गेल्याने किंवा खरेदीने आपल्या खिशाला चाट नक्कीच बसतो, पण वजन कमी करण्यासाठीदेखील ही पद्धत सर्वोत्तम आहे. जर तुम्ही सुपरमार्केटमध्ये गेलात तर सामान घेऊन जाणारी ट्रॉली घेऊन इकडे-तिकडे जरूर फिरा. अशा प्रकारे, आपण सुमारे 30 मिनिटांत सुमारे 250 कॅलरीज बर्न करू शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.