बहुगुणी हळद! हळदीचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?

Curcuma longa नावाची वनस्पती जगातील काही उष्णकटिबंधीय भागात आढळते, ज्याची मुळे वाळवून त्याची पावडर तयार केली जाते. या पावडरलाच हळद (Turmeric) या नावाने ओळखले जाते. अनेक देशात आता हळदीचे पीक देखील घेतले जाते.

बहुगुणी हळद! हळदीचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?
हळदीचे फायदे
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 9:14 PM

Curcuma longa नावाची वनस्पती जगातील काही उष्णकटिबंधीय भागात आढळते, ज्याची मुळे वाळवून त्याची पावडर तयार केली जाते. या पावडरलाच हळद (Turmeric) या नावाने ओळखले जाते. अनेक देशात आता हळदीचे पीक देखील घेतले जाते. भारताचा (India) समावेश हा आघडीच्या हळद उत्पादक देशात होतो. हळदीमध्ये अनेकप्रकारचे औषधी गुणधर्म (Medicinal properties) असतात. त्यामुळे जवळपास सर्वच भारतीय खाद्यपदार्थांमध्ये हळदीचा समावेश होतो. हळद ही भारतीय लोकांच्या आहारामधील अविभाज्य घटक आहे. हळदीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. हळदीच्या नियमित सेवनामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. हळदीमध्ये कर्करोगापासून बचाव करणारे देखील अनेक घटक असतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते, जे कॅन्सरला वाढण्यापासून रोखते. कर्करोग हा एक प्रकारचा स्वयंप्रतिकार रोग आहे, ज्यामध्ये वाईट पेशी चांगल्या पेशींचा नाश करून झपाट्याने वाढतात. मात्र हळदीमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे या पेशींच्या सक्रमणाला आळा बसतो. आज आपण हळीचे असेच काही फायदे जाणून घेणार आहोत.

सांधेदुखीसाठी हळद फायदेशीर : सांधेदुखीवरचा उपाय म्हणून हळदीकडे पाहिले जाते. ऑस्टियोआर्थराइटिस आणि संधिवात या दोन्हीच्या उपचारात हळद अतिशय उपयुक्त मानली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी घटक, जे सूज वाढण्यापासून रोखतात. यासोबतच हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मही मुबलक प्रमाणात असतात. या आजारात हळदीचे सेवन फायदेशीर ठरते.

मधुमेह नियंत्रित करते : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हळद ही एक रामबाण उपाय आहे. हळद रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तसेच, जर तुम्ही मेटफॉर्मिन घेत असाल तर हळद शरीरात त्याचा प्रभाव वाढवते. औषध त्वरीत आणि सहजतेने प्रभावी होते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा हळद उकळून त्या पाण्याचे नियमित सेवन करावे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते : हळद अनेक रोगांपासून आपले संरक्षण करते. तसेच हळदीचे नियमित सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारशशक्ती देखील वाढते.

कोलेस्ट्रॉल कमी करते: हळदीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. जर तुमचे कोलेस्टेरॉल आधीच वाढले असेल तर ते कमी करण्यास हळदीचे नियमित सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

टीप : वरील माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

PCOS Cure : डॉक्टरांचा सल्ला ते डाएटिंग, PCOS पासून आयुष्यभराची मुक्ती; वाचा डॉक्टरांच्या टिप्स

घसा खवखवण्याच्या समस्यांपासून या घरगुती उपायांनी आराम मिळवा

आता कोरोनाला संपवायचं असेल तर मास्क मुक्त होऊनच जगावं लागेल कारण…

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.