Alcohol : ‘ही ‘ लक्षणे दिसताच समजा, लिव्हर झाले आहे पूर्णपणे डॅमेज !

लिव्हर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग असतो. लिव्हर शरीरात औषधे, मद्य आणि टॉक्सिक अथवा विषारी पदार्थ तोडणे, पित्त तयार करणे आणि ग्लूकोज साठवणे अशी विविध कार्य करते. मात्र अनेक गोष्टींमुळे लिव्हर डॅमेज होऊ शकते. त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे अधिक प्रमाणात दारुचे सेवन करणे होय.

Alcohol : 'ही ' लक्षणे दिसताच समजा, लिव्हर झाले आहे पूर्णपणे डॅमेज !
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 3:05 PM

मुंबईः यकृत म्हणजेच लिव्हर (Liver) हा एक अवयव असतो जो पोटाच्या वरच्य बाजूस स्थित असतो. ते बरडग्ड्यांच्या आतमध्ये असते. लिव्हर शरीरात औषधे, मद्य आणि टॉक्सिक अथवा विषारी पदार्थ तोडणे, पित्त तयार करणे आणि विशिष्ट प्रकारची विटॅमिन्स व ग्लूकोज साठवणे अशी विविध कार्य करते. तसेच रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने तयार करण्याचे कार्यही लिव्हर करते. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचे लिव्हर खराब (Liver damage) होऊ शकते. खरंतर लिव्हरचे टिश्यूज पुन्हा बनू शकतात. मात्र जर तुमचे लिव्हर पुन्हापुन्हा खराब होत असेल तर स्कार टिश्यूज तयार होऊ लागतात. हे स्कार टिश्यूज हेल्दी लिव्हर टिश्यूजना रिप्लेस करतात. असे झाल्यास लिव्हरचे कार्य सुरळीतपणे चालण्यास अडचणी निर्माण होतात. लिव्हर डॅमेज होण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे अधिक प्रमाणात दारुचे सेवन (drinking too much alcohol) करणे होय. जेव्हा दारूमुळे लिव्हर खराब होते, तेव्हा त्याला अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसीज म्हटले जाते.

अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसीजची लक्षणे काय असतात आणि दारुमुळे लिव्हरवर काय परिणाम होतो, हे जाणून घेऊया.

शरीरातील विषारी घटक किंवा पदार्थ तोडण्याचे काम लिव्हर करते. त्यामध्ये मद्याचाही समावेश आहे. जेव्हा तुम्ही मद्याचे सेवन करता तेव्हा लिव्हरमधील विविध एंजाइम्स ते तोडण्याचे कार्य सुरू करतात, जेणेकरून ते (मद्य) आपल्या शरीराबाहेर टाकले जाऊ शकेल. जेव्हा तुम्ही तुमच्या लिव्हरच्या क्षमतेपेक्षा अधिक मद्याचे सेवन करता तेव्हा तुमचे लिव्हर डॅमेज होण्यास सुरूवात होते. त्यामुळे तुमच्या लिव्हरमधील चरबी वाढते आणि कालांतराने, हेल्दी लिव्हर टिश्यूज डॅमेज होऊन स्कार टिश्यूज निर्माण होतात. मद्यपानामुळे होणाऱ्या लिव्हरच्या आजाराची सुरूवातीला काही लक्षणे दिसत नाहीत. मद्यपानामुळे लिव्हर किती खराब झाले आहे, याचा तुम्हाला अंदाज येत नाही.

मद्यपानामुळे लिव्हर खराब झाल्यास काही लक्षणे दिसतात. त्यामध्ये लिव्हरला सूज येणे, ज्यामुळे पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूस त्रास होऊ शकतो. तसेच थकवा, काहीही कारण नसताना वजन कमी होणे भूक न लागणे, उलटी होणे, अशी लक्षणे दिसतात.

खूप मद्यपान केल्याने काय होतं ?

मद्यपानामुळे लिव्हरचा आजार झाल्यास तीन समस्यांचा सामना करावा लागतो. त्याबद्दल जाणून घेऊया –

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज –

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजला हेपेटिक स्टीटोसिस ही म्हटले जाते. तुमच्या लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यास सुरूवात झाल्यावर हा आजार होतो. खूप मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा त्रास खूप कॉमन आहे. त्याची फारशी लक्षणे दिसत नाहीत. थकवा, कारणाविना वजन कमी होणे, लिव्हरच्या आसपास त्रास होणे, अशी लक्षणे जाणवू शकतात. काही आठवडे मद्यपान न केल्यास ही समस्या दूर होऊ शकते , तर काही लोकांना जास्त वेळ लागू शकतो

अल्कोहॉलिक हेपेटायटिस –

जर तुम्ही सतत, खूप मद्यपान करत असाल तर लिव्हरची सूज वाढते. ज्यामुळे तुम्हाला अल्कोहॉलिक हेपेटायटिसचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामध्ये लिव्हरच्या आसपास वेदना, थकवा, कमी भूक लागणे, ताप, उलटी अशी लक्षणे दिसू शकतात. अल्कोहॉलिक हेपेटायटिस हा सौम्य आणि तीव्र असू शकतो. सौम्य त्रास असताना त्यामध्ये लिव्हर हळूहळू खराब होते. तर गंभीर अल्कोहॉलिक हेपेटायटिस असेल तर लिव्हर अचानक खराब होऊ शकते. या त्रासापासून मुक्ती हवी असेल तर मद्यपान पूर्णपणे बंद करावे लागेल. तसेच औषधोपचारांसोबत चांगला व पौष्टिक आहारही घ्यावा लागेल. अल्कोहॉलिक हेपेटायटिस झालेल्या व्यक्तीला कधीकधी लिव्हर ट्रान्सप्लांटही करावे लागू शकते.

अल्कोहॉलिक सिरोसिस

सतत मद्यपान केल्यामुळे हेल्दी लिव्हर टिश्यूज खराब होऊ लागतात आणि स्कार टिश्यूज तयार होतात. याला फिब्रोसिस म्हटले जाते. फिब्रोसिस वाढल्यास अल्कोहॉलिक सिरोसिस चा तत्रास सहन करावा लागतो. अल्कोहॉलिक सिरोसिसची लक्षणे ही अल्कोहॉलिक हेपेटायटिस सारखीच असतात. तसेच अल्कोहॉलिक सिरोसिस मुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ – लिव्हरमध्ये रक्तप्रवाह वाढणे, पोटात फ्लूइड जमा होणे, रक्तातील विषारी घटक वाढल्यामुळे ब्रेन डॅमेज होणे, संसर्ग वाढण्याचा धोका, किडनी खराब होणे आणि लिव्हर कॅन्सर, असे त्रास होऊ शकतात.

दारूमुळे होणाऱ्या लिव्हरच्या आजाराची जोखीम –

– बऱ्याच काळापर्यंत अधिक प्रमाणात दारू प्यायल्याने लिव्हर खराब होण्याचा धोका वाढतो.

– महिलांमध्ये मद्यपनामुळे होणाऱ्या लिव्हर डॅमेजचा धोका पुरुषांच्या तुलनेत अधिक असतो.

– जाडेपमाची समस्या असलेल्या लोकांमध्ये मद्यपनामुळे होणाऱ्या लिव्हर डॅमेजचा धोका अधिक असतो.

– हेपेटायटिस B व हेपेटायटिस C च्या समस्येचा सामना कराव्या लागणाऱ्या लोकांमध्ये लिव्हर डॅमेजचा धोका खूप जास्त असतो.

कसे सुधारावे लिव्हरचे आरोग्य?

काही सोप्या उपायांनी तुम्ही लिव्हरचे आरोग्य सुधारू शकता. दारू न पिणे हा त्यातील एक सोपा उपाय आहे. दारूचे सेवन कमी करणे आणि ती कधी-कधी पिणे यामुळे लिव्हरच्या आजाराचा धोका कमी होतो. महिला व पुरुषांनी किती प्रमाणात दारू प्यावी हे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲंड प्रिव्हेन्शन (CDC)ने सांगितले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, महिला रोज 1 ड्रिंक तर पुरुष रोज 2 ड्रिंक्स घेऊ शकतात.

तसेच पौष्टिक आहार, म्हणजेच धान्यय, प्रोटीन्सचे सेवन करणेही आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरते. साखर, अनहेल्दी फॅट या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे. नियमितपणे व्यायाम करावा. वजन आटोक्यात ठेवावे. आणि नियमितपणे हेल्थ चेकअप करावे. या सर्व उपायांनी तुम्ही लिव्हरचे आरोग्य सुधारून लिव्हर डॅमेजचा धोका कमी करू शकता.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...