AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Calcium Deficiency : कमकुवत हाडं, सांध्यामध्ये वेदना… कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात अशी अनेक लक्षणे, कोणत्या पदार्थांचे सेवन ठरते फायदेशीर ते जाणून घ्या..

नखं लवकर तुटणे, सांध्यामध्ये वेदना होणे, हाड कमकुवत होणे अशी अनेक लक्षण शरीरात कॅल्शिअमची कमतरतात दर्शवतात. त्यासाठी कोणते पदार्थ खाणे उपयुक्त ठरते ते जाणून घेऊया.

Calcium Deficiency : कमकुवत हाडं, सांध्यामध्ये वेदना... कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात अशी अनेक लक्षणे, कोणत्या पदार्थांचे सेवन ठरते फायदेशीर ते जाणून घ्या..
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 28, 2023 | 3:44 PM
Share

नवी दिल्ली : निरोगी शरीर हवे असेल तर व्यायाम करण्यासोबतच पौष्टिक व संतुलित आहार (nutritional diet) घेणे आवश्यक आहे. समतोल आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वे आढळतात. याच आवश्यक पोषक घटकांपैकी एक म्हणजे कॅल्शिअम (calcium). मुलांच्या शारीरिक विकासात कॅल्शिअम महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील हाडे कमकुवत (weak bones) होऊ लागतात. तसेच सांधेही दुखू लागतात. शरीरात कॅल्शिअमची कमतरता असल्यास कोणकोणती लक्षणे दिसतात, ते जाणून घेऊया.

– स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे हेही शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेचे लक्षण आहे. त्यामुळे स्नायू दुखू लागतात. कधी ही वेदना सुसह्य असते तर कधी खूप वेदनादायक असते. शरीरात पाण्याची कमतरता असतानाही क्रॅम्प्सची समस्या उद्भवू शकते.

– एखादा निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडत असेल किंवा तुमची स्मरणशक्ती कमकुवत होत असेल, तर तीही कॅल्शिअमच्या कमतरतेचे लक्षणे असू शकतात.

– मतिभ्रम होण्याची समस्या हे देखील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होऊ शकते. जर तुम्हालाही भ्रमाची समस्या असेल, तर तुमच्याही शरीरात कॅल्शिअमची कमतरता असू शकते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या आहारात कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा पुरेसा समावेश करावा.

– आजकाल सांधेदुखीची वेदना सामान्य आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही या समस्येचा त्रास होतो. तसेच त्यामुळे तरुणांचेही हाल होत आहेत. वेळोवेळी तुमचेही सांधे दुखत असतील तर ते शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेचे लक्षण आहे.

– तुमची नखं लवकर तुटतात का ? त्याचे उत्तर हो असेल तर हेही कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होते, हे समजून घ्या. यासाठी रोज दूध आणि दही यांचे सेवन घ्या. यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते.

– हात आणि पायांना मुंग्या येणे, हा त्रास देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. जर तुम्हालाही हात-पायांमध्ये मुंग्या येत असतील तर आहारात पुरेशा प्रमाणात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा नक्कीच समावेश करा.

– कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदय गतीमध्ये बदल देखील दिसून येतात. यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ताबडतोब योग्य उपचार करा.

– उन्हाळ्यात तुमची त्वचा कोरडी राहिली तर कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवू शकते. हिवाळ्यात कोरडी त्वचा सामान्य असते, पण उन्हाळ्यात कोरडी त्वचा असणे ही चिंतेची बाब असते. हे कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेदेखील देखील होते.

कशी करावी कॅल्शिअमची कमतरता पूर्ण ?

कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी दूध, दही, चीज, लोणी, ताक, अंडी, बदाम, तीळ, संत्री, बेरी, अंजीर, टोफू, अक्रोड इत्यादी पदार्थांचा तुमच्या आहारात नियमितपणे समावेश करा. या गोष्टींचे सेवन केल्याने शरीरात पुरेसा कॅल्शिअमचा पुरवठा होतो.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.