लवंग आरोग्यासाठी रामबाण, अतिरेक केल्यास ‘हे’ तोटे, जाणून घ्या

| Updated on: Nov 25, 2024 | 3:17 PM

Clove Side Effects: लवंग हा आरोग्याचा खजिना आहे, हे तुम्हाला माहितच आहे. पण. काळजीपूर्वक खा कारण अतिरेक केल्यास नुकसान होऊ शकतं. लवंगचे फायदे आणि तोटे, दोन्हीही जाणून घ्या.

लवंग आरोग्यासाठी रामबाण, अतिरेक केल्यास ‘हे’ तोटे, जाणून घ्या
Follow us on

तुम्ही लवंग खाता का? लवंग खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात यात शंका नाही. पण, हे तुम्हाला माहिती असायला हवं की लवंग खाल्ल्याने किंवा त्याचा अतिरेक केल्यानं हानिकारक देखील ठरू शकतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती गोष्ट आपल्याला बाधते. लवंगचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.

लवंग हा एक मसाला आहे. हे देखील तुम्हाला माहितच असेल. लवंग हा केवळ चवदारच नाही तर औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. पुलाव यासह अनेक पदार्थांमध्ये किंवा पाककृतींमध्ये चव वाढवण्यासाठी आपण अनेकदा लवंग घालतो. अर्थातच लवंग घातल्यानं चव छान लागते.

लवंग या गरम मसाल्याच्या मदतीने हर्बल चहा किंवा काढा तयार केला जातो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आपण अनेक प्रकारचे इन्फेक्शन आणि आजार टाळतो. म्हणजे यासाठी देखील लवंग किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला समजून आले असेल.

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध डायटीशियन आयुषी यादव यांनी सांगितले की, लवंगचे कितीही फायदे असले तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अनेक प्रकारचे तोटे सहन करावे लागू शकतात. याकडे देखील तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही.

जास्त लवंग खाण्याचे तोटे कोणते?

जास्त लवंग खाण्याचे तोटे कोणते? याविषयी आज आम्ही माहिती देणार आहोत. आहारतज्ज्ञ आयुषी म्हणाल्या की, लवंगमध्ये युजेनॉल (Eugenol) नावाचा घटक आढळतो. त्याचा काळजीपूर्वक वापर करणे महत्वाचे आहे. अन्यथा यामुळे शरीरात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

मेंदूवर होणारा परिणाम

लवंगमध्ये असलेल्या युजेनॉलचे (Eugenol) सेवन मर्यादेत करावे अन्यथा डोकेदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्हाला आधीपासूनच ही समस्या असेल तर लवंग खाणे अधिकच धोकादायक ठरेल.

तोंडाचे व्रण

तोंडात अल्सर असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थाचा म्हणजेच लवंगचा आस्वाद घेऊ शकणार नाही. तुम्हाला हे माहिती असायला हवं की, जास्त लवंग खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो. अशा वेळी तोंडात वेदना, सूज आणि रक्तस्त्राव अशी लक्षणे उद्भवतात. त्यामुळे लवंग खाताना या गोष्टीची काळजी घ्या.

पोटाशी संबंधित आजार

अनेक लोक लवंग खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. अशा लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, अतिसार आणि उलट्या होतात. यामुळे स्वत: वर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.