Child health: लहान मुलांच्या डोक्याचा आकर का वाढतो ? काय आहे या आजारामागील कारण!!
बाळ जन्माला येण्यापूर्वी किंवा वयाच्या पहिल्या वर्षी मुलाचे डोके आणि चेहऱ्याचा आकार बदलून जातो.अनेकदा बाळ जन्मल्या नंतर किंवा त्यांच्या एका वर्षाने शरीरात काही बदल जाणवून येतात.अनेकदा मुलाचे डोके मोठे होते आणि दिवसेंदिवस डोक्याचे आकार वाढू लागते.चेहऱ्याचा आकार देखील बदलू लागतो. डोळे आत खोल जातात ही सारी लक्षणे आहे एका आजाराची.आज आपण गंभीर आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.
बाळ जन्माला येण्यापूर्वी किंवा वयाच्या पहिल्या वर्षी मुलाचे डोके आणि चेहऱ्याचा आकार बदलून जातो.अनेकदा बाळ जन्मल्यानंतर किंवा त्यांच्या एका वर्षाने शरीरात काही बदल जाणवून येतात.अनेकदा मुलाचे डोके मोठे होते आणि दिवसेंदिवस डोक्याचे आकार वाढू लागते.चेहऱ्याचा आकार देखील बदलू लागतो. अनेकदा बाळाचे पालक चिंता व्यक्त करतात. नेमके काय होत आहे हे सुद्धा कळत नाही कारण की बाळाचे एवढे वय सुद्धा नसते की त्याला होणारा त्रास असतो आपल्या तोंडाद्वारे सांगू शकेल म्हणूनच आज आपण या गंभीर आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत? या आजार होण्यामागील कारणे काय आहेत या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
अनेकदा बाळ व्यवस्थित जन्माला आलेले असते परंतु काही दिवसाने बाळाच्या शरीराच्या जडण घडणीत अचानक बदल जाणवू लागतो.डोक्याचा आकार वाढू लागतो ,चेहऱ्याची पट्टी बदलू लागते आणि डोळे सुद्धा आत खोल शिरतील की काय अशी भावना मनामध्ये येऊ लागते. ही लक्षणे सगळी एका गंभीर आजाराची आहेत या आजाराचे नाव आहे क्रेनियोसायनॉस्टॉसिस. अशी काही लक्षणे व समस्या जाणवल्यावर अनेकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला पाहिजे. जर डॉक्टरांनी ऑपरेशन सर्जरी करायला सांगितल्यास तज्ञ मंडळींचा सल्ला आवश्यक घ्यायला पाहिजे चला तर मग जाणून घेऊया या आजारावर उपचार कशा पद्धतीने करायचा त्याबद्दल…
भारतात प्रत्येकी 2500 लहान मुलांमधील एका मुलाला क्रेनियोसायनॉस्टॉसिस हा आजार असतो असे निदर्शनास आले आहे.सगळ्यात आधी जाणून घेऊया हा आजार नेमका काय आहे या मागे नेमके कारण काय..
क्रेनियोसायनॉस्टॉसिस हा आजार आहे का?
डॉक्टर हिमांशु अरोड़ा हे सीनियर कंसल्टेंट, न्यूरो एंड स्पाइन सर्जरी, फ़ोर्टिस, फ़रीदाबाद येथील तज्ज्ञ डॉक्टर आहेत.डॉक्टर हिमांशू यांनी लल्लनटॉप शी बातचीत करताना सांगितले की,
क्रेनियोसायनॉस्टॉसिस हा एक जन्मजात होणारा आजार आहे.कधी कधी या आजाराचे लक्षण वयाच्या पहिल्या वर्षातच कळून येतात व ते शरीरावर दिसून येतात.आपल्या डोक्याच्या आतील काही हाडे जे एकमेकांशी जोडली गेलेली असतात. हे जोड कधी कधी वेळेच्या आधी एकमेकांच्या संपर्कात येतात या कारणामुळे डोके,चेहऱ्याचा आकार यांच्यात बदल झालेला पाहायला मिळतो.या सगळ्या गुंतागुतीच्या स्थितीत चेहऱ्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो. या आजाराला क्रेनियोसायनॉस्टॉसिस असे म्हंटले जाते. योग्य ती तपासणी केल्यावरच आपल्याला कळते की नेमके शरीरातील म्हणजेच डोक्याच्या हाडातील नेमके कोणते जोड आधी जोडले गेले आहे. पुढील हाड की मागील हाड जोडले गेलेले आहे.तसेच क्रेनियोसायनॉस्टॉसिसचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार सुद्धा असतात. या आजारामध्ये लहान मुलाचे डोक्याचा आकार बिघडू लागतो.अनेकदा डोके पुढून त्रिकोणी होऊन जाते.काही जणांच्या डोळ्यांचा आकार जहाज प्रमाणे चपटे होते.या वेगवेगगळ्या आकारामुळे या आजाराला वेगवेगळे नाव सुद्धा दिले गेले आहे.
हा आजार होण्याची ही आहेत काही कारण
क्रेनियोसायनॉस्टॉसिस हा एक जेनेटिक आजार आहे म्हणजेच हा आजार परिवार/ नातेवाईक द्वारा या मुलांना होत असतो.
क्रेनियोसायनॉस्टॉसिस एक जन्मजात आजार आहे.ज्या मुलांमध्ये हा आजार झालेला पाहायला मिळतो त्यांचे हृदय, कान, नाक, गळा , किडनी या सर्व अवयवांची तपासणी केली जाते. या सर्व तपासणीच्या आधारे कोणता डिफेक्ट आहे का? हे चेक केले जाते.
या आजाराची लक्षणं
जन्माच्या वेळी किंवा एका वर्षाच्या आत मुलाच्या डोक्याचा व चेहऱ्याचा आकार बदलेला पाहायला मिळतो. चेहऱ्यावरील नसा जास्त चमकदार आणि मोठ्या होऊन जातात. अशावेळी लहान मुलगा खूपच मोठ मोठ्याने आणि जलद गतीने रडू लागतो. लहान मुलांच्या डोक्यावर जास्त प्रेशर येत असेल तर असे होईल मुलगा वारंवार उलट्या करू लागतो . प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी होऊ लागते. लहान मुलगा दूध किंवा कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करत नाही. गरजेपेक्षा जास्त वेळ झोपतो. डोक्याचा आकार वाढून गेल्यामुळे डोळे खोल गेले आहेत असे वाटू लागते. वरीलपैकी कोणतीही लक्षणे जर तुमच्या लहान मुलांमध्ये आढळून आले तर अशावेळी न्यूरो सर्जनची भेट अवश्य घ्या. जर तुमच्या आजूबाजूला एखादा न्यूरोसर्जन नसेल तर अशा वेळी लहान मुलांचे डॉक्टरांना आवश्यक दाखवा आणि योग्य वेळी योग्य उपचार करा.
करा अश्या प्रकारे निदान
लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवल्या नंतरच अंदाज लावला जाऊ शकतो की कोणत्या प्रकारची चाचणी या आजारांमध्ये करायची आहे तसेच एखाद्या चाचणीची आवश्यकता आहे कि नाही हे सुद्धा डॉक्टर बाळाला बघून त्वरित सांगतील. जर काही लक्षणे जाणवत असेल तर अशा वेळी डॉक्टर लहान मुलांचे संपुर्ण हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ज्या मुलांमध्ये या आजाराबद्दलची काही लक्षणे जाणवतात अशा वेळी हृदय,कान नाक,गळा ,किडनी या सर्वांची एकदा तपासणी केली जाते.
त्याचबरोबर बाळ केव्हा जन्माला आला? मुलगा कितवा आहे? तसेच हा आजार एखाद्या नातेवाईक आला आहे का असे अनेक प्रश्न डॉक्टराद्वारे बाळाच्या आई वडिलांना विचारले जातात त्यानंतर बाळाची शारीरिक चाचणी केली जाते. मुलाच्या डोक्याचा आकार मोजून डोक्याचे आकार हे नॉर्मल रेंज मध्ये आहे कि नाही हे सुद्धा तपासले जाते. अनेकदा अनेक न्यूरो सर्जन मुलाचा 3d सिटीस्कॅन किंवा एम आर आय करण्यास सुद्धा सांगतात.
उपचार या आजाराचे निदान प्रामुख्याने सर्जरी द्वारे केले जाते. वयाच्या पहिल्या वर्षीच ही सर्जरी प्रामुख्याने करावी लागते. कारण की लहान मुलांच्या शरीरातील हाडे ही नाजूक आणि मुलायम असतात आणि म्हणूनच अशा वेळी लवकर उपचार केलेले नेहमी चांगले राहते. या काळा दरम्यानच या डोक्यातील हाडांवर ऑपरेशन करणे सोपे असते. ऑपरेशन करत असताना डॉक्टरांचे विशेष लक्ष सुद्धा असते म्हणजेच की डोक्यावर जाणारा प्रेशर कमी करणे जेणेकरून मेंदूचा विकास सर्वसाधारण पद्धतीने व्यवस्थित रित्या होऊ शकेल
तसेच दुसरी पद्धत म्हणजे डोके आणि चेहरा यांच्यातील आजार बरे केले जाऊ शकतील.हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला एका चांगल्या भूल तज्ञ डॉक्टरची गरज भासते जेणेकरून ऑपरेशन च्या दरम्यान तो मुलाला योग्य पद्धतीने भूल देऊ शकतो त्याचबरोबर एक चांगली क्रिटिकल केअर टीम असणे सुद्धा गरजेचे आहे. डोक्यामध्ये गुंतागुंतीच्या समस्या जास्त असतील तर अशा वेळी न्यूरोलॉजिस्ट आणि प्लास्टिक सर्जनची सुद्धा आवश्यकता भासू शकते.
डॉक्टर्स हिमांशु यांचे असे म्हणणे आहे की, बाळ जन्माला आल्यानंतर व वयाच्या पहिल्या वर्षाच्या आत जर वरील काही लक्षणे तुम्हाला आढळून आले तर अशा वेळी कोणतीही दिरंगाई न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार योग्य वेळी करणे गरजेचे आहे. अशावेळी लगेचच एका न्यूरो सर्जनची भेट घ्या आणि न्यूरो सर्जनच्या आधारे बाळाची ट्रीटमेंट सुद्धा त्वरित सुरू करा सोबतच अजिबात घाबरण्याची गरज नाही डॉक्टर योग्य सर्जरी पद्धतीने आणि योग्य उपचाराच्या आधारे तुमच्या मुलाला लवकर बरे करू शकतात फक्त वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
टिप्स: या लेखामध्ये सांगितले गेलेली माहिती डॉक्टरांनी लल्लनटॉप यांच्याशी बातचीत करताना सांगितलेली आहे. टीव्ही 9 तुम्हाला या बातमीचे समर्थन करायला किंवा या लेखांमध्ये सांगितलेले मते प्रत्यक्ष उपयोग करण्याचा अजिबात सल्ला देत नाही. तसेच टीव्ही 9 तुम्हाला कोणत्याही प्रकारचे औषधे सेवन करण्याचा मार्ग सुद्धा दाखवत नाही आणि म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणं जाणवत असतील तर घरच्याघरी उपाय न करता तुमच्या कुटुंबातील डॉक्टरांना अवश्य भेट द्या.)