Sugar Side Effects: साखरेच्या अतिसेवनामुळे शरीरावर होतात हे दुष्परिणाम

तुम्हालाही गोड खायला आवडतं का ? मग सावध व्हा. कारण साखरेचे अतिसेवन केल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. गरजेपेक्षा जास्त गोड खाल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते.

Sugar Side Effects: साखरेच्या अतिसेवनामुळे शरीरावर होतात हे दुष्परिणाम
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 3:03 PM

नवी दिल्ली – निरोगी राहण्यासाठी, आपण प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्ब्स, चरबी आणि खनिजे यांसारख्या सर्व पोषक घटकांचे (nutrition) सेवन करणे महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या रोजच्या जेवणात अशा काही गोष्टी असतात, ज्याचा शरीराला फायदा होत नाही, तरीही आपण त्यांचे सेवन करतो. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे साखर. साखर खाल्ल्याने (sugar) आपल्या शरीराला फायदा होत नाही. जास्त गोड किंवा साखरेचे अतिसेवन (side effects of sugar) केल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. ज्यामध्ये वजन वाढणे, मधुमेह, दात किडणे आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो. म्हणजेच निरोगी शरीर हवे असेल तर त्यासाठी आपण कमीत कमी साखरेचे सेवन करणे गरजेचे आहे.

जास्त गोड खाल्याने शरीरात होतात हे बदल

ॲक्ने

हे सुद्धा वाचा

जास्त साखर खाल्ल्याने एंड्रोडनता जास्त प्रमाणात स्राव होतो, ज्यामुळे मुरुमे येऊ शकतात.

अशक्तपणा

जास्त साखर किंवा मिठाईचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते, ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. कारण बहुतेक साखरयुक्त पदार्थांमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो.

उच्च रक्तदाब

साखरेचा रक्तदाबावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

वजन वाढू लागते

चॉकलेट, मिठाई किंवा साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वेगाने वाढू लागते.

मूड खराब होणे अथवा वाईट मनस्थिती

आहारातील अतिरिक्त साखरेचे सेवन केले तर त्याचा मूडवर परिणाम होतो. यामुळे सतत चिडचिड होते, मूड खराब होतो.

सांधेदुखी

साखरेचे जास्त सेवन करणे आणि संधिवात हे निगडीत असल्याचे सुचवणारे बरेच संशोधन झाले आहे. म्हणजेच, जर तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर तुमच्या हाडांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

झोप न येणे

अशक्तपणा आणि चिडचिड यामुळे झोपेवरही परिणाम होतो. जास्त गोड खाल्ल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो.

पोटाच्या समस्या

ज्या लोकांना आधीच आतड्याच्या समस्या आहेत, त्यांनी साखरेचे अतिसेवन केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.

मग साखरेला आरोग्यदायी पर्याय कोणता ?

साखरेऐवजी मध किंवा गुळाचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. पण मध, गूळ आणि साखर यांचा ग्लायसेमिक इंडेक्स समान असल्यामुळे अनेक आरोग्य तज्ञ यावर विश्वास ठेवत नाहीत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.