कोरोनाचा सर्वाधिक धोका कुणाला? यादी जाहीर, तुमचं नाव तपासा!

कोरोनाचा इतका संसर्ग का पसरत आहे किंवा इतके रुग्ण का वाढत आहेत, त्याच्या कारणांची एक यादी केंद्र सरकारने (Modi government) जारी केली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक धोका कुणाला? यादी जाहीर, तुमचं नाव तपासा!
Corona virus
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 3:27 PM

मुंबई : कोरोना रुग्णसंख्येने दिवसेंदिवस नवनवे विक्रम रचण्यास सुरु केले आहेत. लाखोंच्या संख्येने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने (Coronavirus) आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. महाराष्ट्रात तर 15 दिवसांची संचारबंदी (Maharashtra Sanchar Bandi) करण्यात आली आहे. मात्र अजूनही राज्यात दररोज जवळपास 60 हजार रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा इतका संसर्ग का पसरत आहे किंवा इतके रुग्ण का वाढत आहेत, त्याच्या कारणांची एक यादी केंद्र सरकारने (Modi government) जारी केली आहे. (Who is most at risk Corona infection what who said list shared by Government of india corona update)

सरकारने #IndiaFightsCorona ट्विटर अकाउंटवरुन ही यादी शेअर करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या बचावासाठी ही उपयुक्त ठरेल असा विश्वास सरकारला आहे. धुम्रपान, हृदय आणि श्वसनासंबंधित आजार कोरोना व्हायरससाठी जास्त धोकादायक असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे.

सरकारने ट्विटर अकाऊंटवरुन व्हायरस पसरवणाऱ्या धोक्यांची यादी आणि गाईडलाईन शेअर केली आहे.

1) ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, वृद्ध व्यक्ती ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे , त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. अशा व्यक्तींसाठी कोरोनाकाळात खबरदारी घेणे आवश्यक आहे.

2) धुम्रपान करणाऱ्यांना धोका जास्त 

जागतिक आरोग्य संघटना WHO च्या मते, तंबाखू सेवनामुळे कोव्हिड 19 संसर्गाचा धोका वाढू शकतो. सध्या SARS-CoV-2 संसर्ग आणि धुम्रपान यामध्ये होणारे धोके जास्त आहेत. जानेवारी महिन्यात लंडनमधील रिसर्चनुसार, जे कोरोना रुग्ण सध्या रुग्णालयात अॅडमिट आहेत त्यामध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या अधिक आहेत. म्हणजेच जे धुम्रपान करतात त्यांना संसर्ग लगेच होतो असा त्याचा अर्थ काढता येईल.

3) मधुमेह रुग्णांचा कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

ज्या रुग्णांना मधुमेह किंवा डायबेटिज आहे, अशा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहेच, पण गंभीर लक्षणे आणि मृत्यू होण्याचं प्रमाण तीनपट आहे.

4) हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार 

हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाचा जास्त धोका आहे. हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार एकापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाने होत नाही. मात्र हे आजार गंभीर स्वरुपाचे असल्याने, अशा रुग्णांना कोरोना झाल्यानंतर धोका अधिक वाढतो, असं WHO चं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या    

थकवा, सांधेदुखी ते थंडी, दुर्लक्ष करु नका! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी लक्षणे कोणकोणती?

Corona virus : किती दिवसात बनतात अँटीबॉडीज आणि आजारी पडल्यावर कधी दाखल व्हावे रुग्णालयात, जाणून घ्या तज्ज्ञांची उत्तरे

रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड आणि प्लाझ्माची गरज आहे?; वाचा, या ठिकाणी मिळणार संपूर्ण माहिती

Explained: कोरोना निदानात पल्स ऑक्‍सिमीटरचं महत्त्व वाढलं, काय उपयोग, कसं वापरावं, किंमत किती?

Who is most at risk Corona infection what who said list shared by Government of india corona update

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.