Heart Attack : सोमवारी सकाळीच का येतो हॉर्ट अटॅक; धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या पतीने सांगितले हे कारण, डॉ. श्रीराम नेने यांनी दिला हा अलर्ट
Dr. Shriram Nene : देशत हृदय विकाराने मरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आता तरुणांमध्ये पण हे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सकाळीच हर्ट अटॅक येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामागील कारण काय आहे? हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी त्याची माहिती दिली आहे.

गेल्या काही वर्षात हृदयरोगाने मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातच नाही तर जगभरात हॉर्ट अटॅकमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनुवांशिक कारणाव्यतिरिक्त बदलेली जीवनशैली त्यासाठी कारणीभूत आहे. नवीन संशोधनात काही तथ्य समोर आली आहेत. त्यानुसार, आठवड्यातील एका दिवशी हृदय रोगाचा धोका अधिक असतो. सोमवारी सकाळच्या सत्रात हॉर्ट अटॅकच्या घटना सर्वाधिक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामागचे कारण काय? धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी त्याचा खुलासा केला आहे.
डॉ. नेने यांनी काय दिला अलर्ट
हॉर्ट अटॅक विषयी विख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि शल्यविशारद डॉ. श्रीराम नेने यांनी महत्वाची माहिती दिली. त्यानुसार, सोमवारी सकाळी हृदय रोगाचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी सावधगिरीचा सल्ला त्यांनी दिला. आकडेवारीनुसार, सोमवारी हृदय विकाराची शक्यता इतर दिवसांपेक्षा जवळपास 13 टक्के अधिक आहे. यापूर्वी पण सोमवारी हृदयविकार येण्याच्या शक्यतेवर जगभरात चर्चा झाली आहे. ब्रिटिश हॉर्ट फाऊंडेशनच्या एका अहवालानुसार, सोमवारी हॉर्ट अटॅक येण्याचा धोका 13 टक्क्यांनी वाढतो. याला ‘ब्लू मंडे’ असे नाव देण्यात आले आहे.




सोमवारचे कारण काय
डॉक्टर नेने यांच्यानुसार, आठवड्याच्या अखेरीस बहुतेक प्रत्येक जण त्यांचा आवडता कार्यक्रम पाहतो. मित्र, कुटुंबियासोबत पार्टी वा इतर काहीतरी एन्जॉय करण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामुळे रात्री जागरण होऊ शकते. या दिवशी खाणे आणि पिण्यावर नियंत्रण नसते. सकॉर्डियन रिदममध्ये बदल होण्याची शक्यता असते. रविवारी रात्री झोप कमी होते. त्याला सोशल जेट लेग असे ही म्हणतात. कमी झोप अथवा झोपण न लागल्याने शरिरातील रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो.
सकाळी कितीपर्यंत अधिक धोका
सोमवारी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. सोमवारी सकाळी उठल्यावर ब्लड कोर्टिसोल आणि हार्मोन अधिक वाढते. त्यामुळे सर्काडियन रिदम होऊ शकतो. झोपण्याच्या आणि लवकर उठण्यामुळे जीवनशैली बदलते आणि त्याचा फटका बसतो.