शरीरातून घाम का निघतो?, प्रकृतीसाठी चांगलं की वाईट?, वाचा सविस्तर…

तुम्हीही अशाच लोकांपैकी आहात का, ज्यांना खूप घाम येतो. प्रत्येकाला घाम येण्याची कारणे वेगवेगळी असून शकतात.

शरीरातून घाम का निघतो?, प्रकृतीसाठी चांगलं की वाईट?, वाचा सविस्तर...
घाम
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 11:15 AM

मुंबई : तुम्हीही अशाच लोकांपैकी आहात का, ज्यांना खूप घाम येतो. प्रत्येकाला घाम येण्याची कारणे वेगवेगळी असून शकतात. व्यायाम केल्यानंतर आणि उन्हाळ्यात घाम येणे स्वाभाविक आहे. मात्र, घाम येणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की, नाही असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडलेला असतो. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी घाम येणे महत्वाचे आहे. परंतु आजच्या काळात सर्व कामे लॅपटॉप व मोबाईलवर अवलंबून आहेत. (Why does sweat come out of the body, is it good or bad for health?)

लोक शारीरिक हालचाली व्यवस्थित करत नाहीत. यामुळे घाम देखील येण्याचे प्रमाण आता कमी होत आहे. घाम म्हणजे शरीरातून पाण्याचे लहान थेंब बाहेर पडतात. ज्यामध्ये अमोनिया, युरिया, मीठ आणि साखर इत्यादी असतात. जेव्हा जेव्हा आपल्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा घामाच्या ग्रंथी शरीराच्या तापमानाचे नियमन आणि शरीरातून पाणी शोषून घेते. यामुळे घाम घेणे शरीरासाठी चांगलेच असते.

व्यायाम करताना घाम येणे चांगले

जेव्हा आपण व्यायाम करता तेव्हा घाम येणे खूप महत्वाचे आहे. कारण व्यायामादरम्यान आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि हृदय वेगवान होते. अशा परिस्थितीत घाम येण्याने आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहते आणि ऊर्जा येण्यास मदत होते.

शरीर स्वच्छ होते

घाम आल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. बऱ्याच संशोधनात असे सिध्द झाले आहे की, घामामधून मीठ, साखर, कोलेस्ट्रॉल आणि अल्कोहोल सारखे पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडतात. अशा परिस्थितीत शरीर चांगले साफ होते आणि सर्व अवयव अधिक चांगले काम करतात.

त्वचा चांगली होते

घाम आल्यामुळे आपली त्वचा चांगली आणि स्वच्छ होते. त्वचेचे छिद्र घाम झाल्यामुळे उघडले होतात. अशा परिस्थितीत त्वचेवर जमा झालेले धूळ देखील घामातून बाहेर पडते. यामुळे त्वचा निरोगी होते आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

दररोज व्यायाम करताना घाम येत असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगले आहे. कारण व्यायाम करताना घाम आल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आजार आपल्यापासून दूर राहतात.

हे पण लक्षात ठेवा

– जर काहीही न करता आपल्याला घाम येत असेल तर हृदयविकाराचा झटका देखील असू शकतो, यावेळी आपण विलंब न करता तज्ञांचा सल्ला घ्या.

– काही लोकांना घामामुळे अॅलर्जी होण्यास सुरवात होते आणि शरीरावर पुरळ उठते किंवा खाज सुटण्याची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत आपण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

– केंद्रीय मज्जासंस्था, रक्ताभिसरण यासह अल्कोहोल शरीराच्या इतर अनेक भागावर देखील परिणाम करते. जास्त मद्यपान केल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि यामुळे जास्त प्रमाणात घाम येण्याची समस्या उद्भवू शकते.

-या व्यतिरिक्त ज्या लोकांना ताण किंवा चिंतेची समस्या असते, त्यांनाही सामान्य माणसांपेक्षा जास्त घाम फुटतो. तसेच काही औषधांमुळे जास्त घाम येणे ही समस्या देखील उद्भवू शकते.

-जेव्हा एखादा रुग्ण हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त असतो तेव्हा त्याचे शरीर अधिक उष्ण आणि उष्णतेबद्दल खूपच संवेदनशील बनते. यामुळे अशा लोकांना जास्त प्रमाणात घाम येणे, ही समस्या सुरू होते.

संबंधित बातम्या : 

मुंबईत 15 जुलैपासून पाचव्या सेरो सर्व्हेक्षणास सुरुवात; सर्व वयोगटांच्या अँटीबॉडीज तपासणार!

भारताची नवी कोरोना लस ZyCov-D, तीन डोस घ्यावे लागणार, सुई विना लसीकरण, वाचा सविस्तर

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दोन दिवस वाढ, कोरोनाबळीही पुन्हा हजारापार

(Why does sweat come out of the body, is it good or bad for health?)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.