रडूबाई…काय गं लगेचच कसं तुझ्या डोळ्यात पाणी येतं…

Health Tips दु:ख असो किंवा आनंद आपल्या डोळ्यात पाणी येतं. डोळ्यातून भावना कळतात असं म्हटलं जातं. एखाद्याला काहीही म्हटलं की डोळ्यात चटकन पाणी येतं. अगदी चित्रपट किंवा सिरीयलमधील एखाद्या भावूक प्रसंग बघतला की सहज त्यांचा डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात पाणी येणं हे तुमच्या भावनाशी जोडलेलं असतं. आपल्या डोळ्यात रडल्यानंतर पाणी का येतं याचा कधी विचार केला आहे का?

रडूबाई...काय गं लगेचच कसं तुझ्या डोळ्यात पाणी येतं...
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 1:57 PM

काय गं रडूबाई…सतत काय आपलं गंगाजमुना वाहत असते तुझी. असे वाक्य अनेकांनी ऐकले असतात. अती दु:ख झाल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर आनंदही झाला तरी आपण रडतो. तुम्ही हे ऐकलं असेल काय त्याचे मगरचे अश्रू आहेत. यामागे कारण म्हणजे तो खोटं रडत असतो असं या वाक्याचं अर्थ आहे. डोळ्यातून येणारे अश्रू हे आपल्या मनातील भावना सांगण्याचं एक माध्यम असतं.

डोळ्यात पाणी कधी येतं?

पण तुम्हाला माहिती आहे डोळ्यात पाणी येण्याचे पण तीन कारणं आहेत. म्हणजे जेव्हा आपल्याला इफेक्शन होतं किंवा डोळ्याला इजा होते तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर बदलेल्या वातावरणात एकदम जोरदार वाऱ्याचा प्रवाहात आपण असल्यास आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर तिसरं कारण रडण्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं.

का येतं डोळ्यात पाणी?

जेव्हा आपण भावनिकदृष्टा अगदी वरच्या टोक्यावर पोहोचतो तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात. इमोशनल व्यक्तींच्या डोळ्यात लवकर पाणी येतं. शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्स बदलामुळेही आपल्या डोळ्यात पाणी येतं. स्त्रीयांमध्ये प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन अधिक असल्यामुळे स्त्रीया या जास्त रडतात. त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. तर आपण पाहिलं आहे पुरुष खूप क्विचत रडतात. कारण पुरुषांच्या शरीरात अधिक प्रमाणात टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन असते. हे पुरुषांना रडण्यापासून रोखून धरतात. म्हणून सहसा पुरुष रडताना दिसत नाही. या दोन हॉर्मोन्सशिवाय इतर काही हॉर्मोन्स आणि न्युरोट्रान्समिटर देखील रडण्यामध्ये महत्त्वाचे असतात.

डोळे कायम ओलसर दिसतात

डोळे निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी ते कायम ओलसर असणे गरचेचं आहे. डोळ्याला आवश्यक असलेला ओलसरपणा राहण्यासाठी अश्रुग्रंथी सतत एक खास द्रव तयार करत असते. हा द्रव पापण्यांच्या हालचालीनुसार आपल्या डोळ्यात पसरलेला असतो. या द्रवामुळे डोळे स्वच्छ राहतात तसंच डोळ्याला झालेली इजाही या द्रवामुळे बरी होते.

कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं

हो सर्वसाधारण कांदा कापताना प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं कारण त्यात असलेलं केमिकलमुळे आपल्या डोळ्यातील अश्रुग्रंथीतून पाणी येण्यास सुरुवात होते. कांद्यामध्ये सिन-प्रोपें‍थि‍यल-एस-ऑक्सातइड या नावाचं केमिकल असतं.

रडणे चांगले असते

हो, म्हणतात रडणे चांगले असते कारण त्यातून तुमच्या भावनांना मार्ग मोकळा मिळतो. तुमचा ताणतणाव या अश्रूतून बाहेर पडतो. त्यामुळे तुम्हाला शांत आणि चांगलं वाटतं. पण मात्र डोळ्यातून येणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करुनही चालणार नाही. जर तुमच्या डोळ्यात सतत पाणी येत असेल काही कारण नसताना तर हे आजाराचं एक लक्षण असू शकतं. अशावेळी तुम्ही डॉक्टरांशी नक्की संपर्क करा.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

इतर बातम्या-

VIDEO : Elaction Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 19 January 2022

तुम्ही गर्भवती आहात…आणि तरीही अकोल्होलचं सेवन करता आहात…मग सावधान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.