AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hormonal Imbalance : महिलांनो इकडे लक्ष द्या…. या उपायांच्या मदतीने करा हार्मोन्स संतुलित

जीवनशैलीत बदल झाल्यास त्यामुळे हार्मोनल असंतुलन होते, तसेच त्याचा विविध मार्गांनी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषत: स्त्रियांमध्ये त्याची वेगवेगळी लक्षणे असतात जी नैसर्गिकरित्या नियंत्रित करता येऊ शकते.

Hormonal Imbalance : महिलांनो इकडे लक्ष द्या.... या उपायांच्या मदतीने करा हार्मोन्स संतुलित
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 31, 2023 | 2:01 PM
Share

नवी दिल्ली – निरोगी जीवनशैलीसाठी निरोगी शरीर आणि निरोगी मन हे दोन्ही आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने चांगला आहार (food) सेवन करणे, नियमित व्यायाम करणे (exercise) आणि तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल झाल्यास त्यामुळे हार्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance) होते, तसेच त्याचा विविध मार्गांनी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हार्मोनल असंतुलन केवळ महिलांमध्येच नव्हे तर पुरूषांमध्येही होते. पण थोड्या वेगळ्या अंतःस्रावी प्रणालीच्या उपस्थितीमुळे स्त्रियांमध्ये हार्मोन्समध्ये असंतुलन होण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिकरित्या (natural remedies) हार्मोन्सचे संतुलन कसे राखावे हे जाणून घेऊया.

स्त्रियांसाठी हार्मोनल संतुलन राखणे महत्वाचे का आहे?

हार्मोन्स आपल्या शरीरात केमिकल मेसेंजर म्हणून काम करतात, जे भूक, वजन आणि मूड नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात. पीरियड सायकल, ओव्ह्युलेशन, फलित नसलेल्या अंड्यांचे संरक्षण आणि गर्भधारणेसाठी स्त्रीचे शरीर तयार करणे यामध्ये हार्मोन्सची भूमिका महत्वाची असते. हार्मोनल असंतुलन आपल्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते आणि स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकते.

हार्मोनल असंतुलनाची लक्षणे

जीवनशैलीत होणारे बदल आणि आपल्या आहारातील निवडी हे हार्मोनल असंतुलनाचे मुख्य कारण आहेत, त्यामुळे आपल्या तणावातही भर पडते. परंतु हार्मोनल असंतुलनाचा आव्हानात्मक भाग म्हणजे ची लक्षणे ओळखणे. मूड स्विंग, अनियमित मासिक पाळी, नैराश्य आणि चिंता, तसेच केस गळणे, अपुरी झोप, पुरळसारख्या त्वचेच्या समस्या आणि थकवा यांचा त्या लक्षणांमध्ये समावेश असू शकतो.

नैसर्गिकरित्या हार्मोन्स कसे संतुलित करावे ?

1) योग्य आहार

असंतुलित आहार आणि पोषणाचा अभाव असेल तर त्याने काम होणार नाही. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. निरोगी आहारामध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे, तसेच शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट आणि चरबी यासारख्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा समावेश असावा. अयोग्य आहारामुळे वजन वाढणे किंवा कमी होण्याची शक्यता आहे. जास्त बॉडी मास इंडेक्स (BMI)असलेल्या महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होण्याची शक्यता जास्त असते.

2) व्यायाम करा

चांगले आरोग्य राखणे हे योग्य आणि संतुलित आहार आणि योग्य व्यायामावर अवलंबून असते. व्यायाम केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे कॅलरी बर्न करणे सोपे होते आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे हार्मोनल संतुलन राखण्यास देखील मदत होते.

3) ताण घेणे कमी करा

तणावामुळे कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन बाहेर पडते, ते शरीराला थोड्या प्रमाणात आवश्यक असते. परंतु जेव्हा तणावामुळे जास्त प्रमाणात कॉर्टिसॉल सोडले जाते तेव्हा ते हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरते. यामुळे लठ्ठपणा, निद्रानाश आणि थकवा यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. स्ट्रेस हार्मोन्स वाढल्याने उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढू शकतो.

4) हाय केमिकल सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळा

एंडोक्राइन डिस्रप्टिव्ह केमिकल (EDCs) शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्वचेद्वारे सहजपणे शोषली जातात. EDCs प्रजननक्षमतेवर परिणाम करतात, तसेच कॅन्सर आणि पुनरुत्पादक अवयवांमध्ये विकृती निर्माण करतात. जरी कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये EDC ची पातळी कमी असली तरीही, यामुळे हार्मोनल असंतुलन होते, म्हणून त्वचेसाठी केमिकलमुक्त सौंदर्य प्रसाधने वापरण्याचा सल्ला दिला जातो.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.