AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World AIDS Day 2022: एड्सपासून वाचायचे असेल तर या चुका टाळा, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावाचे उपाय!

जगभरात कोट्यावधी लोक एड्सने ग्रस्त आहेत. लोकांना या आजाराबद्दल फारच कमी माहिती आहे. या आजाराबद्दल लोकांना माहिती कळावी, यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.

World AIDS Day 2022: एड्सपासून वाचायचे असेल तर या चुका टाळा, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावाचे उपाय!
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 11:31 AM

नवी दिल्ली – ॲक्वायर्ड इम्यून डेफिशिअन्सी सिंड्रोम याला सामान्य भाषेत एड्स (AIDS) या नावाने ओळखले जाते. हा एक असा दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये (संबंधित) व्यक्तीचा हळूहळू मृत्यू होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, 2021 सालापर्यंत जगभरात सुमारे 3.8 कोटी लोक या आजाराशी लढा देत आहेत. गेल्या वर्षी जगभरात एड्समुळे 6.50 लाख लोकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. भारतातही दरवर्षी एड्सची लाखो प्रकरणे नोंदवली जातात. आज (1 डिसेंबर) जागतिक एड्स दिनाच्या (World AIDS Day) पार्श्वभूमीवर, हा आजार कसा होतो व त्यापासून बचाव कसा केला जाऊ शकतो, हे जाणून घेऊया.

एड्स म्हणजे नेमके काय? तो शरीरावर कसा हल्ला करतो?

दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राकेश गुप्ता सांगतात की, HIV आणि एड्स यामध्ये मोठा फरक आहे, तो समजून घेणे आवश्यक आहे. खरंतर एचआयव्ही हा व्हायरस आहे तर एड्स हा एक आजार आहे. एचआयव्ही हे असे इन्फेक्शन आहे जे रक्तावाटे लोकांच्या शरीरात पसरते. एकदा हा संसर्ग शरीरात शिरला तर तो आयुष्यभर टिकतो. मात्र एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही झाला असेल तर त्याला एड्स होईलच, असे काही नाही. कधीकधी यामुळे लोकांना अनेक वर्षं त्रास होत नाही. मात्र हा विषाणूजन्य संसर्ग आपल्या शरीरातील फुफ्फुसे, किडनी (मूत्रपिंड), यकृत, तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा यासह विविध अवयवांमध्ये पसरल्यास हानी पोहोचवू लागतो, तेव्हा या अवस्थेला एड्स म्हणतात. या संसर्गामुळे आपल रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते अथवा अपयशी ठरते आणि आपल्या शरीरातील विविध अवयवांचे नुकसान होते.

हे सुद्धा वाचा

HIV पॉझिटिव्ह असणे आणि एड्स होणे यात काय फरक आहे ?

डॉ. राकेश गुप्ता यांनी सांगितले की, काही लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असतात, पण त्यांना एड्स नसतो. असे लोक कोणतीही गुंतागुंत अथवा कॉम्प्लिकेशन न होता आपले आयुष्य व्यतित करू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एचआयव्हीचा संसर्ग किती झाला आहे, हे व्हायरल लोडवरून दिसून येते. एचआयव्हीवर योग्य वेळी उपचार झाले, तर त्यावर नियंत्रण ठेवून एड्स (होणे) टाळता येऊ शकतो. आजच्या आधुनिक युगात अशी अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या विषाणूवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य ठरते. मात्र लोकांनीही याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.

या चुकांमुळे होऊ शकतो एड्स :

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रक्ताद्वारे एचआयव्ही संसर्ग पसरू शकतो. ब्लड ट्रान्स्फ्युजन, आधीच वापरलेली सुई अथवा सीरिंज, दुसऱ्या व्यक्तीचे ब्लेड वापरणे, असुरक्षित लैंगिक संबंध ही एचआयव्ही पसरण्याची सर्वात मोठी कारणे आहेत. समलिंगी व्यक्तींना याचा धोका अधिक असतो, कारण असे लोक एकमेकांच्या रक्ताच्या संपर्कात सहज येऊ शकतात. तुमच्या हिरड्यांमधअये समस्या असेल व रक्तस्त्राव होत असल्यास, दुसऱ्या व्यक्तीला किस केल्यास त्या व्यक्तीला एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो. तसेच रक्ताद्वारेही हा संसर्ग पसरू शकतो. मात्र हस्तांदोलन केल्याने किंवा एकत्र जेवल्याने हा एड्स पसरत नाही.

एड्सपासून बचाव करण्याचे उपाय :

– एखाद्या व्यक्तीच्या रक्ताशी संपर्क टाळा

– असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नका

– आधीच वापरलेले इंजेक्शन अथवा सुई यांच्यापासून दूर रहावे, ते वापरू नये.

– कोणत्याही व्यक्तीचे ब्लेड शेअर करू नका

– कोणासोबतही सिगारेट शेअर करू नका.

– काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

एड्ससाठी चाचणी व उपचार काय आहेत ?

डॉ. राकेश गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, एड्सची तपासणी करण्यासाठी एचआयव्ही अँटीबॉडीज, एलाइजा एचआयव्ही अँटीबॉडीज आणि वेस्टर्न ब्लॉट या चाचण्या केल्या जातात. एचआयव्हीचा झाला आहे की नाही याची या चाचण्यांद्वारे तपासणी केली जाते. जेव्हा तुम्ही रक्तदान करताना त्यावेळी एचआयव्हीचीही तपासणी केली जाते. उपचारांबद्दल सांगायचे झाले तर, एचआयव्हीचा व्हायरल लोड किती आहे हे आधा डॉक्टर तपासतात. जर तो खूप कमी असेल तर उपचारांची आवश्यकता नसते. मात्र तो जास्त असल्यास त्यावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. सध्या बाजारात अशी अनेक चांगली औषधे आहेत जी 99% प्रकरणांमध्ये एचआयव्ही नियंत्रित करू शकतात. मात्र एडसची ही समस्या मुळापासून दूर होईल, असे कोणतेही औषध आतापर्यंत तयार झालेले नाही. औषधांच्या सहाय्याने त्यावर केवळ नियंत्रण ठेवता येऊ शकते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.