World Alzheimer’s Day 2023 | अल्झायमर आजारात ( विस्मृती ) कोणता आहार घ्यावा ?

अल्झायमर रोग हा मेंदूशी संबंधीत आजार आहे. या आजारात माणसांना काही आठवत नाही. या आराजाला रोखण्यासाठी मेंदूचे आरोग्य चांगले राखायला हवे त्यासाठी आहारात खालील अन्न पदार्थांचा समावेश करावा.

World Alzheimer's Day 2023 | अल्झायमर आजारात ( विस्मृती ) कोणता आहार घ्यावा ?
healthy foodImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 9:12 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : अल्झायमर रोग हा मेंदूशी संबंधीत आजार आहे. या आजारात विस्मृतीचा आजार जडतो. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. आजकाल नैराश्याचा आजार वाढत आहे. त्यामुळे अल्झायमर रोग जडण्याचाही धोका जडतो. या आजारासंबंधी जनजागृती होण्यासाठी दरवर्षी 21 सप्टेंबर हा ‘वर्ल्ड अल्झायमर डे’ म्हणून साजरा केला जातो. आजकाल कमी वयात लोकांना विस्मृतीचा आजार जडतो. त्या आपली स्मृती चांगली ठेवण्यासाठी आहारात योग्य अन्न पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. पाहूयात कोणते अन्न पदार्थांचा डाएट मध्ये अंतर्भाव हवा…

अल्झायमर आजारात लोकांना साध्या गोष्टी आठवत नाहीत. या आजारातून वाचण्यासाठी मेंदूला तल्लख ठेवायला हवे. मेंदू तजेलदार राहावा यासाठी आहारात काही अन्नपदार्थांचा समावेश करायला हवा. हे फूड्स तुमची मेमरी बूस्ट करण्यास मदत करतील. पाहा कोणते पदार्थ आहेत ते.

ब्लु बेरीज

ब्लुबेरीज मेंदूला तल्लख करण्यासाठी रामबाण मानले जाते. यात पोषक तत्वे भरपूर असतात. या सुपरफूड मानले जाते. यात आयर्न, फायबर, फॅटी एसिड सारखी पोषक तत्वे असतात.

ब्रोकली

पोषकतत्वांमुळे ब्रोकली खूपच महत्वाची भाजी असून तिच्या आहारातील समावेशाने मेंदूचे आरोग्य सुधारते. यात विटामिन्सची मात्रा जादा असते. मेंदूला ही भाजी उपकारक आहे.

नट्स

स्मृती वाढविण्यासाठी डायटमध्ये नट्सचा समावेश करु शकता. या विटामिन्स – ई आणि हेल्दी फॅट आढळते. मेंदू तेज होण्यासाठी अक्रोड, बदाम, काजू , पिस्ता आदी नट्स खाऊ शकता.

संत्री

सी विटामिन्सने भरपूर असलेली संत्री आहारासाठी फायदेशीर असतात. अल्झायमर धोका कमी करण्यासाठी संत्री आहारात असावी. अंडी – अंडी आरोग्यासाठी उत्तम असतात. त्यात विटामिन्स बी आणि कोलीन असते. यामुळे मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. मेंदूच्या आजारापासून दूर रहाण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात अंडी असावित.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....