मुंबई : उच्च रक्तदाब ही आजकाल वेगाने वाढणारी आरोग्य (Health) समस्या आहे. या आजारामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढतात. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. व्यस्त आणि खराब जीवनशैलीचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. रात्री उशीरापर्यंत जागणे, सकाळी उशीरापर्यंत अंथरूणावर पडून राहणे, सतत मोबाईल किंवा लॅपटाॅप वापरणे, व्यायामाचा (Exercise) अभाव आणि बाहेरील तेलकट आणि चमकदार पदार्थांचे अतिसेवन यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सातत्याने वाढताना दिसते आहे. अशा परिस्थितीत निष्काळजीपणामुळे भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात आणि त्यावेळी वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते. मग फक्त उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त गोळ्या खाणेच आपल्या हातामध्ये राहते. उच्च रक्तदाब (High blood pressure) टाळण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करायला हव्यात. तसेच उच्च रक्तदाबाची नेमकी कोणती लक्षणे आहेत, यासंदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
बरेच असे लोक असतात की, त्यांना थोडे जरी काम केले तर लगेचच थकवा जाणवतो. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हे उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. काही लोक थकवा जाणवतो आहे म्हणून सतत घरामध्ये बसतात, मात्र हे देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आपण थकवा जाणवत असेल तरीही थोडा व्यायाम हा नक्कीच करायला हवा.
बऱ्याच लोकांना सतत छातीत दुखण्याची समस्या असते. मात्र, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष न करता आपण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण छातीत दुखण्याचे सामान्य कारण नसते. अनेक वेळा पळताना देखील छातीमध्ये दुखण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी एका डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
उन्हाळ्याचा हंगाम म्हटंले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यामध्ये अनेकांना चक्कर येण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी आपण याकडे दुर्लक्ष न करता डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. उच्च रक्तदाबामुळे चक्कर येते, अशावेळी चक्कर येणे आणि उलट्या होण्याची समस्या असू शकते. मग अशावेळी डाॅक्टरांचा लगेचच संपर्क साधा.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, उच्च रक्तदाबाची अनेक कारणे आहेत. त्यामुळे प्रामुख्याने म्हणजे खराब जीवनशैली आणि बाहेरील अन्नाचे अधिक प्रमाणात सेवन करणे आहे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना तेलकट खाण्याची सवय अधिक असते. मात्र, ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशांनी तेलकट खाण्यापासून चार हात लांब राहिला हवे.