तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय!, एकाच जागेवर जास्त वेळ बसल्यानं आजाराची शक्यता, ‘या’ चुका टाळा…

कोरोना आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम द्यायला सुरुवात केली. त्यानंतर वर्क फ्रॉम होमचं कल्चरचं सुरु झालं. एकाच जागेवर आठ तास बसून काम करणं. अनेकांना सुरुवातीला हे चांगलं वाटलं. घरी बसून काम केल्यानं सुरुवातीला लोकांनी त्याचा मरमुराद आनंद घेतला. मात्र, जास्त वेळ एकाच जागी बसल्यानं शरीराचं नुकसान होऊ शकतो. नेमकं काय नुकसान होऊ शकतं, ते जाणून घेऊया.

तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय!, एकाच जागेवर जास्त वेळ बसल्यानं आजाराची शक्यता, 'या' चुका टाळा...
एकाच जागेवर जास्त वेळ बसल्यानं आजाराची शक्यता बळावतेय.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 3:41 PM

मुंबई :  कोरोना (corona) आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम द्यायला सुरुवात केली. त्यानंतर वर्क फ्रॉम होमचं (Work From Home)  कल्चरचं सुरु झालं. एकाच जागेवर आठ तास बसून काम करणं. अनेकांना सुरुवातीला हे चांगलं वाटलं. घरी बसून काम केल्यानं सुरुवातीला लोकांनी त्याचा मरमुराद आनंद घेतला. मात्र, त्यानंतर कंटाळा येऊ लागला. अनेकांना लठ्ठपणाचा त्रास होऊ लागला. तर अनेकांनी वैतागून वैतागून कार्यालयात जाऊन काम करायला सुरुवात केली. कारण, जास्त वेळ लॉपटॉपसमोर राहिल्यानं शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. याचा परिणाम देखील अनेकांना जाणवला. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यानी कोरोना कमी झाल्यानंतरही वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला ठेवला आहे. तर अनेक ठिकाणी सक्ती करण्यात आली आहे. मात्र, याचा आरोग्यावर परिणाम होत असल्यानं कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना समोरं जावं लागतंय.

ह्रदयासंदर्भातील आजार

वर्क फ्रॉम होम म्हणजे एकाच जागेवर बसून काम करणं. सलग एकाच जागेवर बसून काम केल्यानं शरीराची हलचाल होत नाही. यानं शरीर जाड होण्याची शक्यता असते, वजन वाढू लागतं. एकाच जागेवर बसल्यानं ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यातच अनेक समस्यांची शक्यता घरी बसून आणि त्यातही एकाच जागेवर बसून काम केल्यानं वाढते.

मधुमेहाचा आजार

एकाच जागेवर बसून आठ तास काम केल्यानं लठ्ठपणा तर वाढतोच. शिवाय शरिराची हलचालही रोखली जाते. त्यातच रक्तातून कमी ग्लुकोज मिळू लागतं. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. मघधुमेहाचं नियंत्रण केलं जाऊ शकतं. पण, त्याला पूर्णपणे बरं नाही केलं जाऊ शकत. त्यामुळे या गोष्टीकडे देखील लक्षात घ्यायला हव्यात.

स्नायू कडक होणे

एका जागी बसून काम केल्यानं स्नायूंची लवचिकता हळूहळू कमी होऊ लागते. त्यानंतर स्नायूमध्ये कडकपणा येऊ लागतो. याशिवाय ग्रीवा, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर आदी समस्यांचा धोकाही वाढू लागतो. चुकीच्या आसनामुळे देखील ही समस्या वाढते. त्यामुळे आपण जे काही करतो आहे. त्याचा शरीरावर किती आणि कसा परिणाम होऊ शकतो. याचा विचार करुन काम करायला हवं. तर हाडे देखील ठिसूळ होण्याची शक्यता वाढते. दिवसभर बसल्यानं हाडांवर त्याचे वाईट परिणाम होतात. तर संधिवात, ऑस्टिओपोरोसिस सारख्या गंभीर आजारांचीही समस्या वाढते. एकाच जागी बसून काम केल्यानं हार्मोनलची समस्याही होऊ शकते. त्यामुळे एकाच जागी बसत असाल तर काही वेळानं त्या जागेवरुन उठून फिरावे, यासह डक्टरांचा सल्ला घेऊन काही छोटे व्यायाम केल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

इतर बातम्या

धनंजय मुंडे म्हणतात कोण निलेश राणे? पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादी आक्रमक

पोलिसांचा मोठा निर्णय, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आता पोलीस ठाण्यात यायची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्त म्हणतात रिपोर्ट करा

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांचा साधेपणा; नाशिकमध्ये चालवले गुऱ्हाळ, पंचक्रोशीत चर्चेचा गोडवा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.