Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षांच्या मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा चाकू खुपसला

14 वर्षांच्या एडन फूसीने 13 वर्षांची चिअरलीडर ट्रिस्टन बेलीची हत्या केल्याचा आरोप आहे (boy killed girl in Florida )

14 वर्षांच्या मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा चाकू खुपसला
फ्लोरिडातील हत्येने जगभर खळबळ
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 2:24 PM

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. 14 वर्षांच्या एडन फूसी (Aiden Fucci) या अल्पवयीन तरुणाने 13 वर्षांची चिअरलीडर ट्रिस्टन बेलीची (Tristyn Bailey) हत्या केल्याचा आरोप आहे. एडनने बेलीच्या पोटात 114 वेळा चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याचं पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. पूर्वोत्तर फ्लोरिडातील जंगलात 13 वर्षांच्या चिअरलीडरचा मृतदेह सापडला होता. (14 year old boy killed 13 year old girl in Florida stabbed 114 times to death)

आजन्म कारावास होण्याची शक्यता

सेंट जॉन्स काउंटीतील स्टेट अॅटर्नी कार्यालयाने गुरुवारी ग्रँड ज्युरीच्या माध्यमातून एडन फूसी याला प्रथम श्रेणी हत्येच्या (first-degree murder) आरोपाखाली आरोपी घोषित केले आहे. सोबतच एडन फूसी प्रकरण ज्युवेनाईल कोर्टाऐवजी प्रौढ कोर्टात शिफ्ट करण्याची नोटीस देण्यात आली आहे. आरोपी एडन फूसीला आजन्म कारावास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हत्येचा कट रचत असल्याचे आरोपीचे सूतोवाच

एडन फूसी प्रकरण प्रौढ कोर्टात नेण्याचा निर्णय योग्य तर आहेच, मात्र तो एकमेव पर्याय आहे, असं फ्लोरिडाचे अॅटर्नी आरजे लारिजा यांनी सांगितलं. बेलीच्या पोटात 114 वेळा चाकू खुपसून तिची हत्या करण्यात आली होती. फूसीने आपल्या अनेक मित्रांना आपण कोणाची तरी हत्या करण्याचा कट रचल्याचं सांगितलं होतं. मात्र तो बेलीला ठार मारणार असल्याचं स्पष्ट नव्हतं.

बेलीचा मृतदेह जंगलात सापडला

जॅक्सनविलेतील दक्षिणेला डर्बिन क्रॉसिंग समुदायाच्या सामुदायिक केंद्रात बेली 9 मे रोजी अखेरची दिसली होती. सेंट जॉन्स काउंटी शेरिफ कार्यालयात बेलीच्या आई-वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर एका शेजाऱ्याला बेलीचा मृतदेह जंगलात सापडला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी फूसीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये बेली-फूसी एकत्र

बेलीचा मृतदेह फूसीच्या घराजवळ सापडला होता. तपासकर्त्यांना जवळच्या तलावात एक चाकू सापडला होता. याच चाकूने तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये 9 मे रोजी बेली आणि फूसी यांना अखेरचं एकत्र पाहिलं गेलं होतं.

संबंधित बातम्या :

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक

(14 year old boy killed 13 year old girl in Florida stabbed 114 times to death)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.