चार वर्षाचा चिमुरडा, शाळेत केलं लग्न, गिफ्ट’ म्हणून भेट दिली 12 लाख रुपयांची सोन्याची वीट

पालकांनी घाबरून तिला ही वीट कुणी दिली? तिच्याकडे ही वीट कशी आली याची विचारणा केली. त्यावर तिने दिलेले उत्तर गमंतीशीर होते. आपल्या एका वर्ग मित्राने 'एंगेजमेंट गिफ्ट' म्हणून ती दिली असे उत्तर दिले.

चार वर्षाचा चिमुरडा, शाळेत केलं लग्न, गिफ्ट' म्हणून भेट दिली 12 लाख रुपयांची सोन्याची वीट
China GoldImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 10:15 PM

चीन | 08 जानेवारी 2024 : मुलं म्हणजे देवाघरची फुलं अशी एक म्हण प्रचलित आहे. त्याचा निरागसपणा, लुटूमुटूचं भांडण, त्यांचा राग, हसणं, फुगणं याचं कोण कौतुक होत असतं. पण, अनेकदा मुलांचा हाच निरागसपणा आणि प्रामाणिकपणा पालकांना महागात पडतो. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. बालवाडीत शिकणारी मुलगी तिच्या घरी पोहोचली. तिने शाळेत मिळालेल्या भेटवस्तूबद्दल आनंदाने तिच्या पालकांना सांगितले. मुलीच्या पालकांनी तिला भेटवस्तू दाखवण्यास सांगितले. मात्र ती वस्तू पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

चीनच्या ‘सिचुआन’ प्रांतातील ही घटना घडली. ‘गुआंगन’ बालवाडीत शिकणारी काही मुले आपल्या शाळेतून घरी निघाली. त्यातील एका मुलीची अभ्यासाची बॅग काहीशी जड होती. ती घरी पोहोचली. तिने आनंदाने आपल्या पालकांना शाळेत एक भेटवस्तू मिळाल्याचे सांगितले. पालकांनीही कुतुहलाने ती वस्तू दाखवायला सांगितली. त्यावर तिने आपल्या बॅगेतून सोन्याची वीट काढली आणि पालकांच्या हातात दिली. ती वीट पाहून मुलीच्या पालकांना धक्का बसला. पालकांनी त्या विटेची किमंत काढली असता त्याची किमंत 12.5 लाख रुपये असल्याचे कळले.

सुनेसाठी ठेवली होती वडिलोपार्जित सोन्याची वीट

मुलीच्या पालकांनी लागलीच त्या वर्ग मित्राच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. मुलाच्या पालकांनाही ही घटना कळताच आश्चर्याचा धक्का बसला. मुलाच्या पालकांनी सांगितले की त्यांच्याकडे काही सोन्याची नाणी आहेत. ज्याबद्दल त्यांनी आपल्या मुलाला सांगितले होते. तसेच, सोन्याची एक वीट वडिलोपार्जित आहे ती त्यांनी आपल्या सुनेसाठी म्हणजेच त्याच्या भावी पत्नीसाठी ठेवली आहे असे सांगितले होते. पण, मुलाने शाळेतल्या वर्ग मैत्रिणीला गुपचूप ही सोन्याची वीट भेट दिल्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती अशी माहिती मुलीच्या पालकांना दिली.

सोशल मिडीयावर या प्रकाराची जोरदार चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर ही घटना चांगलीच व्हायरल झाली. या पोस्टवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले या लहान मुलामध्ये हिंमत आहे जो असेच 200 ग्रॅम सोने देतो. तर दुसर्‍या यूजरने माझ्या सासूने मला एक ब्रेसलेट दिले आणि माझ्या मुलाने विचारले की तो त्याच्या एका वर्गमैत्रिणीला देऊ शकतो का? कारण ते तिला चांगले दिसेल.

तर काही जणांनी यासाठी पालकांन दोषी ठरवलंय. पालकांच्या निष्काळजीपणामुल्चेह अशी घटना घडल्याचे एका युजरने म्हटलय. एकाने तर मैत्री असेल तर ती अशी असते. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. यासाठी मुलाच्या पालकांनी सोन्याच्या वस्तू सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.