Police Dog : पोलिस डॉगची कमाल! 70 टन केळींच्या घडातून असे अलगद शोधले हजारो कोटींचे अंमली पदार्थ

Police Dog : पोलिस डॉगने कमाल केली. 70 टन केळींच्या घडातून अलगदपणे त्याने हजार कोटींचे कोकेन सापडून देण्यास मदत केली. त्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.

Police Dog : पोलिस डॉगची कमाल! 70 टन केळींच्या घडातून असे अलगद शोधले हजारो कोटींचे अंमली पदार्थ
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 7:20 PM

नवी दिल्ली : इटलीमधील पोलिसांच्या कुत्र्याने (Italy Police Dog) अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात मदत केली. बरं हे काही सोप्पं काम नव्हतं. हे अंमली पदार्थ मोठ्या खुबीने लपविण्यात आले होते. 70 टन केळीच्या घडांमध्ये कोकेन लपविण्यात आले होते. तस्करांनी यावेळी केळीचा वापर केला होता. इतक्या मोठ्या केळीमधून (Banana) अंमली पदार्थांची (Drug) वाहतूक केल्यास कोणालाच शंका येणार नाही, असा त्यांचा कयास होता. पण इटली पोलिसांच्या या शेरुने त्यांच्या योजनेवर पाणी फिरवले.

2700 किलो ड्रग्स जप्त मंगळवारी इटली पोलिसांना याचा सुगावा लागला. त्यांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी या प्रशिक्षित कुत्र्याच्या मदतीने इक्वेडरहून पाठविण्यात आलेल्या केळीतून 2700 किलो ड्रग्स जप्त केले. 70 टन केळींमध्ये हे अंमली पदार्थ लपविण्यात आले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 90 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 7200 कोटी रुपये किंमत असल्याचा अंदाज आहे.

असा मिळाला क्लू रिपोर्टसनुसार, ड्रग्सची ही खेप इटली मार्गे अर्मेनियात पाठविण्यात येणार होती. गियोईया ताऊरो पोर्टवर दोन कंटेनर्सवर संशय आला. त्यांनी कंटनेरमध्ये तपास करण्याचे निश्चित केले. त्या कंटेनरमध्ये केळी होती. पण यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात कंपनीने केळी पाठवली नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय अजून बळावला होता. त्यामुळे या कंटेनरचा तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

जोएलने केली मदत या दोन कंटेनरमध्ये 70 टन केळी होती. ड्रग्सचा शोध घेणं हे जिकरीचं काम होतं. त्यासाठी त्यांनी जोएल नावाच्या कुत्र्याची मदत घेतली. त्याने इतक्या मोठ्या केळीमधून अखेर कोकेनने भरलेले बॉक्स हुडकून काढले. पोलिसांचा संशय खरा ठरला. तर जोएलने काही मिनिटांतच ही अवघड कामगिरी फत्ते केली.

जोएलवर कौतुकाचा वर्षाव जोएल आल्यावर त्याने कंटेनेरमध्ये वास घेतला. काही घड तो बाजूला करायला लागला. अधिकारी मदतीला धावले. काही मिनिटांनी अंमली पदार्थांचे बॉक्स सापडले. ड्रग्सचा वासाने शोध घेण्यात जोएल निष्णात आहे. त्याने ही कामगिरी बजावली नसती तर हे अंमली पदार्थ अर्मेनिया देशात पोहचले असते. तरुणांसह अनेक जण त्याच्या विळख्यात आले असते. जोएलच्या कामगिरीवर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

37 टन कोकने पकडले 2021 पासून आतापर्यंत या बंदरावर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 37 टन कोकेन पकडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत हजारो कोटी रुपये आहे. अंमली पदार्थांचं मोठे नेटवर्क कार्यरत असून इटलीचे पोलीस त्यांच्यावर करडी नजर ठेऊन आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.