त्या ‘विश्वसुंदरी’वर तो ‘आतंकवादी’ भाळला, तिच्याशी लग्न करण्यासाठी पतीला मारण्याचा प्लॅनही आखला, पण…

श्रीमंती, प्रसिद्धी, ड्रग्ज, वर्णभेदाच्या वेदना, समलिंगी संबंध, नवरा, आई-वडिलांपासून वेगळे होणे, नैराश्य, करिअरची घसरण आणि नंतर वयाच्या ४८ व्या वर्षी तिचा रहस्यमय मृत्यू झाला.

त्या 'विश्वसुंदरी'वर तो 'आतंकवादी' भाळला, तिच्याशी लग्न करण्यासाठी पतीला मारण्याचा प्लॅनही आखला, पण...
OSAMA BIN LADENImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 9:19 PM

मुंबई : जगात तिच्या सौंदर्याची एकच चर्चा होत होती. त्याचवेळी त्याच्या दहशतवादाने क्रूरतेची सीमा गाठली होती. पण, त्याच्यासाठी ती जगातील सर्वात सुंदर महिला होती. त्या विश्व सुंदरीच्या आयुष्यात सर्व काही चांगले होते त्यापेक्षा वाईट अधिक होते. श्रीमंती, प्रसिद्धी, ड्रग्ज, वर्णभेदाच्या वेदना, समलिंगी संबंध, नवरा, आई-वडिलांपासून वेगळे होणे, नैराश्य, करिअरची घसरण आणि नंतर वयाच्या ४८ व्या वर्षी तिचा रहस्यमय मृत्यू झाला. तिच्या प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तो तयार होता. इतकंच नाही तर तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने तिच्या पतीला मारण्याची योजनाही आखली. पण, अखेर त्याची ती प्रेम कहाणी अधुरीच राहिली.

आपल्या दहशतवादाच्या बळावर संपूर्ण जगाचा थरकाप उडविणारा पण तिच्या प्रेमासाठी आतुर झालेला तो दहशतवादी होता ओसामा बिन लादेन. तर तो जिच्यावर प्रेम करत होता ती ‘विश्वसुंदरी’ होती सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका व्हिटनी ह्यूस्टन ( Whitney Houston )

हे सुद्धा वाचा

व्हिटनी ह्यूस्टन हिचा जन्म 9 ऑगस्ट 1963 रोजी न्यू जर्सी येथे झाला. तिची आई, एमिली ह्यूस्टन ही ग्रॅमी विजेती गायिका होती. वडील जॉन रसेल हे माजी लष्करी सैनिक होते. 21 व्या वर्षीच व्हिटनी हिचे गायन क्षेत्रात नाव झाले. ‘होल्ड मी’ हे या तिच्या पहिल्याच गाण्यामुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली.

व्हिटनी ह्यूस्टन जगात लोकप्रिय होती. ती वर्णाने काळी होती पण तिच्या आवाजात जादू होती. याच जादूने जगाला गाण्याचे वेड लावले. तिच्या गाण्याच्या 200 दशलक्ष रेकॉर्डसची विक्री झाली. 8 ग्रॅमी आणि 2 एमी पुरस्कारही तिने जिंकले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचे नाव नोंदवले गेले होते.

तिच्या नावानेच गाणी हिट व्हायची

व्हिटनी ह्यूस्टनने गायलेली सर्व गाणी हिट झाली. 1988 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या 70 व्या वाढदिवसाला 2 लाख लोक जमले होते. त्यावेळी ह्यूस्टनने तिथे गाणी म्हटली होती. त्यावेळी हा कार्यक्रम देशातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून घोषित करण्यात आला होता.

बॉबी ब्राउन सोबत व्हिटनीचे लग्न

एका अवॉर्ड शोमध्ये तत्कालीन लोकप्रिय गायक बॉबी ब्राउन याच्यासोबत व्हिटनी ह्यूस्टनची ओळख झाली. बॉबी हा वादग्रस्त गायक होता. त्याला अंमली पदार्थ बाळगणे आणि दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल तुरुंगात जावे लागले होते. काही भेटीनंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले. 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 18 जुलै 1992 रोजी व्हिटनी ह्यूस्टन हिने बॉबी ब्राउनशी लग्न केले.

ओसामा बिन लादेन व्हिटनीसाठी वेडा

व्हिटनी ह्यूस्टनने गायक बॉबी ब्राउनशी लग्न केले त्यावेळी जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेन सर्वात जास्त खवळला. व्हिटनी त्याच्यासाठी जगातली सर्वात सुंदर स्त्री होती. लादेन तिच्यासाठी इतका वेडा झाला होता की खार्तूम (सुदान) येथील आपल्या हवेलीचे नावही त्याला व्हिटनीच्या नावावरून ठेवायचे होते.

कोट्यवधी रुपये खर्च करून व्हिटनीला भेटण्यासाठी ओसामाला अमेरिकेत जायचे होते. त्यासाठी त्याने एका व्यक्तीशी संपर्क साधून त्याला करोडो रुपये दिले होते ते केवळ व्हिटनीसोबत भेटण्यासाठीच. पण, ती भेट होऊ शकली नाही.

व्हिटनी मनाने मुस्लिम आहे पण ती अमेरिकन संस्कृतीच्या आड राहून ख्रिश्चन म्हणून जगत आहे असा ओसामाला विश्वास होता. तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तिला मिळविण्यासाठी व्हिटनीच्या नवऱ्याला मारून तिच्याशी लग्न करायला तयार होता. अनेकदा त्याने बॉबीच्या हत्येचा कटही रचला होता. पण, तशी संधी त्याला मिळाली नाही. वयाच्या ४२ व्या वर्षी व्हिटनीचा मृत्यू झाला आणि अखेर, त्याची प्रेम कहाणी तशीच अधुरी राहिली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.