VIDEO : ‘ती’ व्यायाम करता करता व्हिडीओ बनवत होती, कैद झाली म्यानमार तख्तापलटची संपूर्ण घटना
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तब्बल 12 लाखाहून अधिक व्यक्तींनी बघितला आहे. (Aerobics instructor capture Myanmar coup During dance video)
नैप्यीडॉ : म्यानमारमध्ये लष्कराने उठाव केला आहे. लष्कराने नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पार्टीच्या सर्वोच्च नेत्या आंग आन सू की यांना अटक केली असून सत्तापालट केला आहे. मात्र लष्कराने म्यानमारच्या संसदेत कसा प्रवेश केला? तिथे सत्ता येण्यापूर्वी वातावरण काय होते? याबाबतचा नुकतंच एक व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे एका महिला डान्सर व्यायाम करतेवेळी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. (Aerobics instructor capture Myanmar coup During dance video)
खिंग हनिन वाई असे या डान्सर महिलेचे नाव आहे. ही महिला म्यानमारच्या संसदेबाहेर व्यायाम करत होती. यावेळी एका व्यक्ती तिचा व्हिडीओ काढत होता. याच व्हिडीओमध्ये लष्कराने म्यानमारच्या संसदेत कशाप्रकारे प्रवेश केला ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तब्बल 12 लाखाहून अधिक व्यक्तींनी बघितला आहे.
या व्हिडीओत दिसत असलेल्या माहितीनुसार, म्यानमारची राजधानी नैप्यीडॉ या ठिकाणी असलेल्या संसदेत लष्कराने प्रवेश केला. या संसदेबाहेर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्ट लावण्यात आले आहेत. मात्र तरीही सैनिकांना या ठिकाणी अगदी सहजरित्या आत जाण्याची परवानगी मिळाली.
विशेष म्हणजे हा व्हिडीओ जेव्हा शूट केला जात होता, तेव्हा त्या डान्सर महिलेला याची कोणतीही माहिती नव्हती. तिच्यामागे हे सर्व काही होत आहे, याचा तिला जराही अंदाज नव्हता. मात्र या सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. (Aerobics instructor capture Myanmar coup During dance video)
दरम्यान या व्हिडीओबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात आल्या. हा व्हिडीओ फेक असल्याचेही अनेकांनी सांगितले. मात्र याबाबत वाई यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. “वाई यांनी या घटनेसंदर्भातील अनेक व्हिडीओ पोस्ट केले. यापूर्वीही मी या ठिकाणी अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत. तसेच सोमवारी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ अगदी खरा आहे. मी गेल्या 11 महिन्यांपासून संसदेबाहेर डान्स व्हिडीओ रेकॉर्ड करते. त्या स्वत: फेसबुकवर शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका आहेत.”
Una mujer hizo su clase de aerobic sin darse cuenta de que estaban dando el golpe de Estado en Myanmar. Y pues puede verse como el convoy de militares llega al parlamento. pic.twitter.com/fmFUzhawRe
— Àngel Marrades (@VonKoutli) February 1, 2021
निवडणुकीत गैरप्रकार
म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकीत 8 नोव्हेंबर रोजी सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीने 476 पैकी 396 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आंग सान सू ची की यांना पाच वर्षासाठी सरकार बनविण्याची संधी देण्यात आली होती. तर, लष्कराचं समर्थन असलेल्या यूनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हल्पमेंट पार्टीला केवळ 33 जागा जिंकता आल्या होत्या. लष्कराने या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या निवडणुकीच्या निकालांचा फेर आढावा घेण्याची विनंतीही लष्कराने निवडणूक आयोगाला केली होती.
लष्कराने नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पार्टीच्या सर्वोच्च नेत्या आंग आन सू की यांना अटक केली असून सत्तापालट केला आहे. आंग सान सू की यांना ताब्यात घेतल्यानंतर देशात एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. म्यानमारच्या सत्तेची सूत्रे आता वर्षभरासाठी लष्कराच्या ताब्यात राहणार आहे. (Aerobics instructor capture Myanmar coup During dance video)
संबंधित बातम्या :